News Flash

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ‘डिफॉल्टर’ यादीत, साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं

माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे.

एरवी सामान्य मुंबईकरांनी पाण्याचं बिल थकवलं तर महापालिकेकडून कठोर पावलं उचलली जातात. अनेकदा पाणीही बंद केलं जातं. मात्र मुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळींबाबत एक न्याय आणि लोकांबाबत एक न्याय महापालिका करत असल्याचं या प्रकारामुळे उजेडात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये पाणी बिल थकलं आहे. तर इतर नेत्यांच्या पाणी बिलाची रक्कम एकत्र केली तर ती ८ कोटीच्या घरात जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिल थकलेलं असूनही मुंबई महापालिका कारवाई का करत नाही हा प्रश्न विचारला जातो आहे.

एक नजर टाकुया कुणाची किती थकबाकी ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार ५५ रुपये

विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थान
थकबाकी- १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये

पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
थकबाकी ३५ हजार ३३ रुपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
थकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
थकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थान
थकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, जेतवन निवासस्थान
थकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थान
थकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान
थकबाकी ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह
थकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये

असे हे थकबाकीचे आकडे आहेत. महापालिकेने वर्षा बंगल्याचं नाव डिफॉल्टर यादीत टाकलं आहे. अशात आता मंत्र्यांना एक न्याय आणि लोकांना दुसरा न्याय असे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 7:24 am

Web Title: cm devendra fadnavis varsha bungalow in defaulter list by bmc 7 lakh water bill pending scj 81
Next Stories
1 धोकादायक झाडे तोडण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा
2 एसटीचे चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच
3 मुंबईतील पहिल्या स्कायवॉकवर हातोडा
Just Now!
X