News Flash

शिडी!

बॉलिवूडमध्ये कोणीतरी गॉडफादर असेल तर आपल्याला फार लवकर आणि सहजपणे या वाटेवर रूळता येईल, हे ओळखून अशा लोकांशी आधी मैत्री करायची आणि मग आपले काम

| June 19, 2013 08:49 am

बॉलिवूडमध्ये कोणीतरी गॉडफादर असेल तर आपल्याला फार लवकर आणि सहजपणे या वाटेवर रूळता येईल, हे ओळखून अशा लोकांशी आधी मैत्री करायची आणि मग आपले काम फत्ते झाले की त्यांचा निरोप घ्यायचा की पुढली पायरी तयारच असते.. या फंडय़ाची पायवाट तयार केली सलमान खान आणि कतरिना कैफने. सलमानचा हात धरून बॉलिवूडमध्ये आलेल्या कतरिनाची गाडी सोहैल खान प्रॉडक्शनपासून यशराजपर्यंत पोहोचली. मग हळूच तिने सलमानपासून आपले नाते तोडले. तिच्यापाठोपाठ सलमानला कधी भाई..कधी दोस्त म्हणत त्याच्या गळ्यात पडून अनेकींनी आपली बॉलिवूडची वाट सुकर करून घेतली. स्वत: सलमानला त्याचा काहीच फायदा झाला नाही. पण अनेकींनी त्याचा शिडीसारखा वापर मात्र करून घेतला.
प्रेमाच्या बाबतीत त्याच्यासारखाच बकरा ठरलाय तो निर्माता-दिग्दर्शक साजिद खान. जॅकलीन फर्नाडिस नामक श्रीलंकन सौंदर्यवतीने साजिदचे मन जिंकले. तो तिला थेट बॉलिवूडमध्ये घेऊन आला. आपल्याच चित्रपटात तिला नायिका केले. आता या जॅकलिनला सलमान खान, जॉन अब्राहम अशांबरोबर चित्रपट मिळायला लागल्यानंतर तिनेही साजिदबरोबर मांडलेला डाव आवरता घेतला आहे.
सलमान खानमुळे कतरिना कै फसारख्या ‘बाहेर’च्या अभिनेत्रीला थेट नंबर वन स्थान पटकावता येते म्हटल्यावर झरीन खान, मग असीन, सोनाक्षी, सना खान कितीतरी जणींनी त्याच्याकडे लकडा लावला. ‘बिईंग ह्युमन’ सलमाननेही त्यांना आधार दिला. मात्र, आधार घेण्याची आणि देण्याची ही पद्धत अन्य बॉलिवूडकरांना मात्र चांगलीच महाग पडतेय. प्रियांका चोप्रानेही आपण स्पर्धेत मागे पडतोय म्हटल्यावर शाहरूखच्या खांद्यावर डोके  ठेवले होते. तर त्याउलट फार कमी वेळात प्रकाशझोतात आलेल्या शाहिदने करीनाचा वापर करून घेतला. रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा दोघे यशराजच्या एकाच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आले खरे पण, रणवीरपेक्षा अनुष्का यशराजमध्ये वरचढ ठरताच त्याने अनुष्काला आपल्या जाळ्यात ओढले, मग परिणीती, सोनाक्षी असे करत करत सध्या रणवीरला सगळ्यात मोठा सहारा मिळालाय तो दीपिकाचा.
जॅकलीनची वेगळीच कथा. तिला बॉलिवूडमध्ये कोणी ओळखेल अशी परिस्थिती नाही. केवळ साजिद खानला ती आवडली. तो स्वत: निर्माता-दिग्दर्शक असल्याने आपल्याच चित्रपटांमधून नायिका म्हणून त्याने तिला पुढे आणले. ते दोघे एकत्र राहत होते. साजिदमुळे जॅकलीनला थेट ‘रेस’ आणि सलमानचा ‘किक’ असे चित्रपट मिळाले. पण, त्यामुळे काही पायऱ्या चढून वर गेलेल्या जॅकलीनने साजिदबरोबरचे आपले नाते संपुष्टात आणले. साजिदने याआधीच जॅकलीनबरोबरच्या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, तिने फसवल्याचे लक्षात आल्यानंतर साजिदने आपल्या चित्रपटातून तिची हकालपट्टी केली. सलमानचेही पुन्हा एकदा रोमानियन मॉडेलशी प्रेमसंबंध जुळले असून ‘बिईंग इमोशनल’ तो लग्नही करणार आहे म्हणे.. तसे झाले तर बॉलिवूडमध्ये आणखी एका ‘कतरिना’चा प्रवेश होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 8:49 am

Web Title: ladder of sucess
Next Stories
1 भाषेच्या वैभवासाठी अर्थव्यवस्थेचे पाठबळ महत्त्वाचे -गिरीश कुबेर
2 पालिकेची मालकी असलेल्या ४५ धोकादायक इमारतींबाबत प्रश्नचिन्ह
3 रजनीकांत यांच्याशी तुलना नको – धनुष
Just Now!
X