गतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात ग्लुकोमा २.६ टक्के आढळतो. ग्लुकोमा आजाराची लक्षणे डोळे लाल होणे, डोळे दुखणे, धूसर दिसणे, उलटी होणे व आजारी वाटणे अशी असतात. ग्लुकोमा हा अगदी नकळत पद्धतीने होतो. १० ते १६ मार्चदरम्यान ग्लुकोमा सप्ताह पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त एका पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
मधुमेह, माईग्रेनने पीडित व्यक्ती, नियमित चष्मा बदलणे, चष्म्याचा नंबर मायनस असणे या व्यक्तींना ग्लुकोमा होण्याचा धोका जास्त असतो. वयाच्या ४० वर्षांच्या आत हा आजार होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे नियमित नेत्र तपासणीचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. सामान्य डोळ्यातून निघणाऱ्या द्रव्याला एक्कर ह्य़ुमर म्हणतात. या द्रव्यांची प्रवाह प्रणाली अवरुद्ध होते, तेव्हा अत्याधिक दबाव पडतो. अत्याधिक दबावाने डोळ्यातून ‘लिक’ किंवा ‘डिफ्लेट’ होत नाही. हा उच्च दाब नेत्र ज्योती सांभाळणाऱ्या नसांवर दबाव आणतो आणि या दबावाने नसा प्रभावित होतात. त्यामुळे दृष्टी कमी होते. डोळ्यांची नियमित तपासणी केल्यामुळे ग्लुकोमाला आळा घातला जाऊ शकतो.