19 September 2020

News Flash

मिहानच्या दुसऱ्या टप्प्याला गती; साडेसात कोटींचा निधी वितरित

मिहान प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी भूसंपादन आणि मोबदला वाटपाच्या कामाला आता वेग आला आहे. शिवणगाव, भामटी परसोडी या भागातील शेतक ऱ्यांच्या जमिनींची

| June 15, 2013 04:14 am

मिहान प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी भूसंपादन आणि मोबदला वाटपाच्या कामाला आता वेग आला आहे. शिवणगाव, भामटी परसोडी या भागातील शेतक ऱ्यांच्या जमिनींची आवश्यकता असल्याने भूमी अधिग्रहण करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले आहे. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ९ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात ७ कोटी ४२ लाखांचा निधी वितरित करण्यात आला.
या प्रकल्पातील दुसऱ्या धावपट्टीसाठी एमएडीसीला जमिनीचा गरज आहे. भामटी परसोडी या क्षेत्रात बहुतांश भाग येतो. शेकडो एकर शेतजमिनी आणि नव्याने बांधलेली घरे या भागात आहेत. प्रकल्पग्रस्त व जिल्हा प्रशासन यांच्यात मोबदल्यावरून मागील काही वर्षांपासून वाद सुरू होता. एमएडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांच्या मध्यस्थीनंतर यावर तोगा निघाला असून वाढीव मोबदल्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
 या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचे काम जिल्हा प्रशासनाकडे आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर उपाय निघू शकला नाही. मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांच्या रोषाचा सामना  करावा लागला. त्यामुळे अनेकदा तर हे मोजणी करणारे पथक तसेच परत गेले होते.  
या प्रकारामुळे अनेक प्रकल्पग्रस्तांचे भविष्य अधांतरी असल्यामुळे यातून त्यांना या चक्रव्यूहातून मोकळे होण्याची इच्छा असल्याने आपली प्रकल्पासाठी जमीन देण्याचे अनेक जमीन मालकांनी मान्य करून तसे संमतीपत्रसुद्धा जिल्हा प्रशासनाला दिले होते. पहिल्या टप्प्यात काही लोकांना शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर मोबदला देण्यात आला.
दुसऱ्या टप्प्यात ९ शेतकऱ्यांना दीड कोटी रुपये प्रती एकर या दराने ७ कोटी ४२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
शासनाकडून या निधी वाटपासाठी एकूण १९ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. अजून २५ कोटीचा निधी येणार आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना  निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने दुसऱ्या पट्टीचा मार्ग मोकळा होणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 4:14 am

Web Title: speedy work of second phase of mihan 7 5 carod fund destributed
टॅग Fund,Mihan
Next Stories
1 दहावीच्या गुणपत्रिका आजपासून मिळणार
2 महापालिका शतकोत्तरी महोत्सवात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार
3 ‘नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य धोरणाची गरज’
Just Now!
X