21 October 2020

News Flash

नगर शहरात दिवसभर आषाढसरी

नगर शहर व परिसरात शुक्रवारी दमदार आषाढसरी कोसळल्या. शहरात दिवसभर संततधार सुरू होती. अधूनमधून मोठय़ा सरी कोसळल्या.

| July 13, 2013 01:43 am

नगर शहर व परिसरात शुक्रवारी दमदार आषाढसरी कोसळल्या. शहरात दिवसभर संततधार सुरू होती. अधूनमधून मोठय़ा सरी कोसळल्या.
मध्यंतरी एक दिवसाचा अपवाद वगळता शहरात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. मात्र गुरूवारपासून पुन्हा वातावरण जमून आले. प्रत्यक्षात पाऊस झाला नव्हता. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात हलकी भुरभूर सुरू झाली, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दुपारी व सायंकाळी वेळ पावसाचा चांगला जोर होता. आषाढ सुरू झाल्यानंतर शहरात प्रथमच दमदार पाऊस झाला. संततधार पावसाने शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. या पावसानेही सखल भागात चांगलेच पाणी साचले. शहरातील रस्त्यांची पावसाने अधिकच दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
जिल्ह्य़ाच्या अन्य भागात विशेषत: ग्रामीण भागात मात्र दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. मान्सूनपुर्व पाऊस चांगला झाल्याने बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी खरीपाच्या पेरण्या झाल्या. मात्र पुढे पावसाने ताण दिल्याने पेरण्या झालेल्या ठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत.        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:43 am

Web Title: today continuos rainfall in nagar city
Next Stories
1 सावेडी रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम
2 पन्हाळगड-पावनखिंड पदभ्रमंतीला प्रारंभ
3 बार्शीत सराफाला २५ लाखांचा गंडा घालणा-या व्यापा-यावर गुन्हा
Just Now!
X