10 August 2020

News Flash

दहावी, बारावीच्या ऑक्टोबर परीक्षेचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांचे (बारावी) निकाल बुधवारी (२८ नोव्हेंबर)

| November 28, 2012 02:10 am

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांचे (बारावी) निकाल बुधवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी एक वाजता जाहीर होणार असून www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
 या वर्षी राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख २३ हजार ३७६ विद्यार्थी बसले होते. एकूण ५७६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ८९ हजार १३४ विद्यार्थी बसले होते. एकूण ३२६ केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचे निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर गुणपत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना सोमवारी (३ डिसेंबर) दुपारी तीन वाजता गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. गुणांच्या पडताळणीसाठी मंगळवार (४ डिसेंबर) ते गुरुवार (१३ डिसेंबर) या कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. निकालासंबंधी काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी (०२०) ६५२९२३१६ अथवा ६५२९२३१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2012 2:10 am

Web Title: today there is result of ssc and hsc october exams
टॅग Hsc,Results,Ssc
Next Stories
1 हस्तांतरीत पाणी योजना आता त्रयस्थ तज्ञांमार्फत तपासणार
2 शाळांकडील अखर्चित निधी जि. प. परत घेणार
3 एनआरएचएमचा पुढच्या वर्षांसाठी ९१ कोटींचा आराखडा
Just Now!
X