कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या अनिलकुमार पाठक, अश्पाक अन्सारी यांना कल्याण जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जाकीर शेख या आरोपीला निदरेष सोडण्यात आले. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. डोंबिवलीत राहणारी पीडित तरुणी पुणे येथे मित्राला भेटण्यास गेली होती. पुण्याहून परतताना तिला उशीर झाला. कल्याण रेल्वे स्थानकात मध्यरात्री उतरल्यानंतर तिने सोबतीसाठी जवळच्या मित्राला बोलविले. पहाटेपर्यंत डोंबिवलीकडे जाण्यासाठी लोकल नव्हती. दोघे कल्याण रेल्वे स्थानकात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी पाठक, अन्सारी तेथे आले. त्यांनी मित्राला मारहाण करून पीडित तरुणीला बाजूच्या झुडपात नेऊन तिथे तिच्यावर बलात्कार केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
बलात्काऱ्यांना दहा वर्षे सक्तमजुरी
कल्याण रेल्वे स्थानकात एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या अनिलकुमार पाठक, अश्पाक अन्सारी यांना कल्याण जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
First published on: 10-01-2014 at 06:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 yeras servitude to repist