बसच्या तिकिट दरांतील वाढीसोबतच ‘बेस्ट’ने बुधवारी मध्यरात्रीपपासून वीजेच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या एकक दरामध्ये तब्बल ९.४७ ते १४.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नव्या दरपत्रकाचा फटका घरगुती, व्यावसायिक, रुग्णालय, आर्थिक दृष्टय़ा दुर्बल अशा सर्वच घटकांना बसला आहे. नव्या दरपत्रकानुसार ३०० एकक वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या बिलात ३०० ते ३२५ रुपयांची वाढ होणार आहे. ० ते १०० एकक वीज वापरणाऱ्या घरगुती mv04ग्राहकांचे वीजदर प्रतिएकक ३ रुपये ५८ पैशांवरून ३ रुपये ९३ पैसे करण्यात आले आहे. १०१ ते ३०० एकक वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजदर प्रतिएकक ७ रुपये ११ पैशांवरून ८ रुपये १६ पैसे इतके करण्यात आले आहेत. व्यावसायिक ग्राहकांना ९.९७ टक्के वाढ सहन करावी लागणार आहे. या ग्रहाकांना ० ते ५०० एककासाठी प्रतिएकक ११ रुपये ०३ पैसे तर रुग्णालयात प्रति एकक ११ रुपये ५५ पैशांवरुन १२ रुपये २५ पैसे वाढ केली आहे. ही वाढ ६.०६ टक्के इतकी आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या वीज बिलात १९.०८ टक्के इतकी वाढ आहे या ग्राहकांना ० ते ३० एककासाठी प्रति एकक १ रुपया ०१ पैशां ऐवजी आता १ रुपया २१ पैसे मोजावे लागणार आहेत.