लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निलंगा येथे २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सरकारी वकिलास पकडले.
निलंगा येथील आनंदनगर भागातील मंदोधरा माधव केंद्रे (वय ३७) यांना निलंगा न्यायालयातील सहायक सरकारी वकील अरुण शिवाजीराव पाटील (वय ४५) याने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या कामासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली होती. केंद्रे यांच्या दाखल प्रकरणात न्यायालयाने आरोपीच्या बाजूने निकाल दिला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या कामाचे बक्षीस म्हणून सरकारी वकील पाटील याने लाच मागितली होती. केंद्रे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. पाटीलला पंचासमक्ष लाच घेत असताना पकडण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
लाचखोर सरकारी वकील जाळय़ात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निलंगा येथे २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सरकारी वकिलास पकडले.
First published on: 24-08-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corrupt government advocate in net