घटना दुरूस्ती व नवीन सहकार कायदा, बँकींग व्यवस्थेपुढील आव्हाने, वसुलीच्या कायद्यातील तरतुदी, या सर्वाविषयी जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२’ च्या निमित्ताने हैदराबाद येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन नाशिक विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल तसेच रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त उपमहासंचालक ए. बी. खान, तालुका उपनिबंधक चंद्रशेखर बारी, विलास देसाई, भास्कर कोठावदे, नानासाहेब सोनवणे, हुकूमचंद बागमार, डॉ. शशिताई अहिरे आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार अॅड. लक्ष्मण उगावकर यांच्या हस्ते झाला.
प्रास्तविकात बँक असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रrोचा यांनी नाशिक विभागातील सर्व सहकारी बँकांच्या विकासासाठी बँकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अद्ययावत असणे गरजेचे असल्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
गौतम भालेराव यांनी नागरी बँकांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले. घटना दुरूस्ती व नवीन सहकार कायदा या विषयावर अनास्कर यांनी तर, कैलासचंद्र अग्रवाल यांनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने लागू केलेल्या नियमांविषयी, विलास देसाई यांनी बँकींग व्यवस्था व संबंधित आव्हाने तर, ए. बी. खान यांनी ‘अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट’ विषयावर मार्गदर्शन केले.
श्रीकांत जाधव यांनी वसुली व त्यासंबंधी कायद्यातील तरतुदी या विषयावर मत मांडले. शिबीरात नाशिक विभागातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या बँकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आंध्र प्रदेश बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बंग, ए. बी. खान, पुण्याच्या महेश को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपमहासंचालक श्रीकांत जाधव, यांच्या उपस्थितीत समारोप झाला. कार्यक्रमास नाशिक विभागातील ४२ बँकांचे २५० प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा बँक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल बाफना यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2012 रोजी प्रकाशित
नवीन कायद्यांविषयी सहकारी बँकांच्या शिबिरात मार्गदर्शन
घटना दुरूस्ती व नवीन सहकार कायदा, बँकींग व्यवस्थेपुढील आव्हाने, वसुलीच्या कायद्यातील तरतुदी, या सर्वाविषयी जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२’ च्या निमित्ताने हैदराबाद येथे आयोजित प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करण्यात आले.
First published on: 18-12-2012 at 02:49 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Direction on new act in sahakari banks meet