राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. निसार देशमुख यांची प्रदेशाध्यक्षांनी नियुक्ती केल्याची घोषणा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केली. अंकुशराव टोपे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. डॉ. देशमुख हे मंत्री राजेश टोपे यांच्या घनसांगवी मतदारसंघातील सुखापुरी गावचे सरपंच आहेत.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून अंकुशराव टोपे हेच आतापर्यंत पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्याआधी काँग्रेसमध्ये असताना त्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. राष्ट्रवादी स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष असणाऱ्या अंकुशरावांनी या वेळेस मात्र संस्थात्मक कारभाराकडे अधिक लक्ष देणार असल्याचे सांगितले. अंकुशराव व प्रमुख पक्षाचे जिल्हाध्यक्षपद हे समीकरण गेल्या २५ वर्षांत प्रथमच तुटले आहे. पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, पक्षातील वरिष्ठ, जिल्ह्य़ातील प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2012 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्हाध्यक्षपदी डॉ. देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. निसार देशमुख यांची प्रदेशाध्यक्षांनी नियुक्ती केल्याची घोषणा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केली. अंकुशराव टोपे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
First published on: 02-12-2012 at 01:44 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr deshmukh selected district president of ncp