पनवेल-मुंब्रा मार्गावरील उथळसर नाका येथे रविवारी दोन मजूर लोखंडी अँगल घेऊन रस्ता ओलांडत असताना मोटारसायकल लोखंडी अँगलवर येऊन धडकली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला त्याचा भाऊ जखमी झाला आहे.
मौलाना अब्बास अब्दुल हमीद पटेल (३०), असे यातील मोटारसायकलस्वाराचे नाव असून तो पनवेल येथील तळोजा गावात राहत होता. उमरमिया अब्दुल रतीफ पटेल (३०), असे त्याच्या भावाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघे पनवेल-मुंब्रा मार्गावरून मोटारसायकलने जात होते. त्या वेळी दोन मजूर खांद्यावरून लोखंडी अँगल घेऊन उथळसर नाका येथील फुजी इंजिनीअरिंग कंपनीजवळील रस्ता ओलांडत होते. या लोखंडी अँगलला त्यांची मोटारसायकल येऊन धडकली. या अपघातात मोटारसायकलस्वार मौलाना याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ उमरमिया जखमी झाला. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
पनवेल-मुंब्रा मार्गावरील उथळसर नाका येथे रविवारी दोन मजूर लोखंडी अँगल घेऊन रस्ता ओलांडत असताना मोटारसायकल लोखंडी अँगलवर येऊन धडकली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेला त्याचा भाऊ जखमी झाला आहे.
First published on: 29-01-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One died in bike accident