भाजपच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे शहाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी तथा पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की यांनी पवार यांच्या निवडीची घोषणा केली.
रविवारी दुपारी शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. नूतन अध्यक्षपदासाठी तेराजण इच्छुक होते. त्यापैकी सातजणांनी माघार घेतल्याने सहाजण अखेरच्या क्षणापर्यंत रिंगणात होते. यात नूतन अध्यक्ष शहाजी पवार व मावळते अध्यक्ष शंकरराव वाघमारे (मोहोळ) यांच्यासह शिवाजीराव गायकवाड (सांगोला), बाळासाहेब मोरे (अक्कलकोट), पंडितराज कोरे (दक्षिण सोलापूर) व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. विजयकुमार शेटे (माढा) यांचा समावेश होता. परंतु यात शहाजी पवार यांनी बाजी मारली.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असून, यापूर्वी १३ मंडलांतील पदाधिकारी निवडण्यात आले होते. या तेरा पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून नवा जिल्हाध्यक्ष निवडण्यात आला. नूतन जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हे उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावचे असून ते माजी खासदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक समजले जातात. देशमुख यांच्या लोकमंगल परिवारात ते विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार यांची निवड
भाजपच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे शहाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी तथा पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की यांनी पवार यांच्या निवडीची घोषणा केली.
First published on: 13-01-2013 at 07:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahaji pawar elected for solapur bjp district chairman
