भारतातील अनेक स्त्रिया आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होताना दिसत आहेत. गुंतवणूक आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात स्त्रिया पुढाकार घेताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ चूल अन् मूल यापर्यंतच मर्यादित राहिलेल्या स्त्रिया आता उद्योग क्षेत्रातही भरारी घेताना दिसत आहेत. नुकत्याच एका अहवालानुसार पैशांची गुंतवणूक करण्यात स्त्रियांचा सगळ्यात जास्त सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- ‘अभिनेत्रीचा सुवर्णकाळ फार तर ३५ व्या वर्षापर्यंत!’- रविना टंडन

अहवालानुसार १८ ते २६ वयोगटातील ६६ टक्के महिलांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातल्या त्यात गुंतवणुकीसाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) यांसारख्या योजनांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. ४९ टक्के महिलांनी SIP मध्ये गुंतवणूक केली होती; तर २५ टक्के महिलांनी SIP आणि एकरकमी गुंतवणूक या दोन्हींना प्राधान्य दिले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म ते आज ४१.०७ कोटींच्या कंपनीच्या अध्यक्ष, फोर्ब्सच्या यादीतील सोमा मंडल कोण?

तसेच २७ ते ३४ वर्षे वयोगटातील महिलांपैकी ६० टक्के महिलांनी पुढील पाच वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये त्यांचे पैसे गुंतवल्याचे अहवालातून समोर आले आहे. ४९ टक्के महिला म्युच्युअल फंडाबाबत अधिक जागरूक होत्या; तर केवळ २६ टक्के महिलांना म्युच्युअल फंडाबाबत माहिती नसल्याची माहिती मिळाली आहे. आता अनेक स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात सहभाग घेताना दिसत आहेत. जवळपास ७१ टक्के महिला गुंतवणूकदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा-१५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांनी आपल्या मुलींना लहापणापासूनच पैशांची बचत अन् गुंतवणूकीचे महत्त्व पटवून द्यायला हवे. केवळ चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच आता स्त्रियांचे आयुष्य मर्यादित राहिले नसून, आता त्या पैसे कमवून आर्थिक स्वावलंबीही बनत आहेत. चांगले आयुष्य जगण्यासाठी स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे तेवढेच गरजेचे आहे.