नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर कायमच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेबसीरिज, डॉक्युमेंटरी प्रदर्शित होत असतात. जगभरातील कन्टेन्ट या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेली 'मसाबा मसाला' ही वेबसीरिजने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता, त्यांची मुलगी मसाबा गुप्ता या दोघींच्या आयुष्यावर या वेबसीरिजचे कथानक बेतलेलं आहे. नीना गुप्ता वेस्ट इंडिज संघातील प्रसिद्ध खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर झाली होती. दोघांनी लग्न केले नाही मात्र त्यांनी एका मुलीला जन्म दिली तीच ही मसबा. मसबाचा जन्म १९८९ साली झाला. तिच्या जन्मापासून एकच खळबळ उडाली होती. कारण तिला जन्म देणाऱ्या दोघांनी लग्न केले नव्हते. आज भारतीय समाजात लग्न या गोष्टीला फार महत्व आहे. आज लिव्ह इन रेलशनशिप हा प्रकार जरी वाढत असला तरी लग्न या गोष्टीला जास्त महत्व आहे. मसाबाचा जन्म झाल्यापासूनच तिला हिणवण्यात आले होते. कारण तिला जन्म दिलेल्या आई वडिलांनी लग्न केले नव्हते, नीना गुप्ता यांनी तिला लहानाचे मोठे केले. व्हिव्हियन रिचर्ड्स विवाहित असूनदेखील त्याचे नीना गुप्ता यांच्याशी प्रेमसंबंध होते. मसाबाने सांगितले की 'माझ्या जन्मापासूनच माझ्याभोवती अनेक वाद निर्माण झाले आहेत. आजही माझ्या आईला सिंगल मदर म्हणूनच बघितले जाते'. मायलेकींनी या वेबसिरीजमध्ये पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. या दोघींचे पात्र काल्पनिक दाखवले आहे. दुसऱ्या सीजनमध्ये मसबाचा घटस्फोट होतो. या वेबसिरीजमध्ये स्त्रीवादी मूल्य उघडपणे मांडली आहेत. “मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत मसाबा या शब्दाचा अर्थ आहे स्वाहिली प्रांतातील राजकन्या, तिच्याबद्दल प्रसिद्ध अशा प्रकाशकांनी मसाबा गुप्ता द लव्ह चाईल्ड ऑफ व्हिव्हियन रिचर्ड्स अँड नीना गुप्ता या नावाने लिहले गेले होते. त्यावर मसबा म्हणाली होती, 'या गोष्टीला अनेकवर्ष उलटून गेली तरी माझी ओळख फक्त एवढ्यापुरतीच राहिली आहे. म्हणून तिने आपली नवी ओळख तयार करण्याचे ठरवले'. तिने 'लव्ह चाईल्ड मसाबा' नावाने फॅशन जगतात पाऊल ठेवले. माझ्या लहानपणापासून माझ्या डोक्यात होतेच लव्ह चाईल्ड. वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत तिला टेनिसपटू व्हायची इच्छा होती मात्र अंगभूत असणाऱ्या सर्जनशीलतेमुळे तिने आपले करियर संगीत किंवा नृत्यामध्ये करायचे ठरवले. तिला लहानपानपासून रंग, उंची यावरून लोकांकडून टोमणे ऐकावे लागत होते. तसेच वडिलांना कायदेशीर मान्यता नसल्याने शाळेतदेखील तिला वडिलांवर तिचे मित्र मैत्रिणी चिडवत असत. बालपणात झालेल्या आघातांचा परिणाम आपल्यावर न होऊ देता ती खम्बिरपणे उभी राहिली आणि स्वतःचा एक ब्रँड बनवला. हा ब्रँड लाँच होण्याआधी तिने इन्स्टाग्राम व्हिडीओवर हे सांगितले होते. आज देशभरात या ब्रँडचे ८ स्टोर्स आहेत. एका मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन तिच्या या धाडसी निर्णयाने बदलला. आज तिच्याकडे यशस्वी उद्योजिका म्हणून बघितले जात आहे. तिने फॅशन जगतात पाऊल ठेवल्यावर तिच्या कंपनीने आदित्य बिर्ला ग्रुप यासारख्या बड्या कंपनीबरोबर काम केले. लिव्हाइस, सॅमसंग यांच्यबारोबर भागीदारी केली. गेम ऑफ थ्रोन्ससारख्या प्रसिद्ध वेबसिरीजसाठी काम केलं. नीना गुप्ता यांची लेक मसाबा दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; लेहेंगा व आईच्या दागिन्यांवर खिळल्या नजरा मसाबाने आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने असं सांगितले होते की 'मी जेव्हा गुगल केलं तेव्हा ८० ते ९०% आर्टिकलस ही माझ्या त्याच आयुष्याबद्दल होती. आपण नेहमीच स्त्रीला एका साच्यातुन बघतो'. मसाबाने या वेबसिरीजमध्ये सांगितले आहे की 'मी आरशात बघितल्यावर मला काहीच आवडेनासं झाल, मोठं झालयावर मला फिट बसतील असे कपडे शोधण्यासाठी धडपड करावी लागली होती. तिने पारंपारिक सौंदर्य आणि सडपातळ मुली, खेळाडूंप्रमाणे ज्यांचं शरीर आहे अशा मुलींचे तिने कौतुक केले आहे. मात्र फॅशन जगतात असे साम्रज्य निर्माण केले पाहिजे जिथे या परिमाणांना स्थान नाही, म्हणूनच तिने अशा मॉडेल्सना घेतले जे सौंदर्याच्या व्याख्येत बसणाऱ्या नव्हत्या'. मसाबा म्हणाली 'एका स्त्रीला ज्या गोष्टीतून जावे लागते जस की प्रेम, तिच शरीरावर असलेलं प्रेम, समाजाने घातलेले नियम तिलादेखील ते पाळावे लागतात'. तिने पुढे सांगितले की ती वडिलांप्रमाणे लढणारी आहे. 'मी बसणारी नाही. मी संघर्षाचा सामना करेन आणि निराकरण करेन. मी अशी व्यक्ती आहे. वयाच्या ७० वर्षीदेखील माझे वडील सर्वांसाठी एक आदर्श आहेत. माझ्याकडे बघणाऱ्या लोकांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आपण आयुष्यात महान गोष्टी करू शकतो या नजरेने लोकांनी बघितले पाहिजे.' सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य 'मसाबा' सीजन २ची सांगता तिच्या वडिलांच्या एका फोनने होणार आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स पहिल्यांदा या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. मसाबा पुढील सीजनच्या बाबतीत म्हणाली 'मी आशा करते की पुढील वेबसिरीजच्या सीजनमध्ये मी माझ्या आयुष्यातील एखादा प्रसंग दाखवू शकेन'. या सिरिजमध्ये देखील तिने फॅशन डिझायनरची भूमिका निभावली आहे.