नवरात्रोत्सवादरम्यान भाविक नऊ दिवस उपवास करतात. तर काही जण उठता-बसता म्हणजे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असा उपवास करतात. या दरम्यान देवीची भक्तिभावे पूजा करत हा सण साजरा करतात. पण हा उपवास नेमका का करतात? त्याचे कारण काय? उपवास कशासाठी केला जातो? याबद्दल  जाणून घेऊया.

आणखी वाचा : Navratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद!

Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

उपवासाचा नेमका अर्थ काय?

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहण्यासाठी केलेला प्रयत्न. पण अनेकदा उपवास हा शब्द उपास असा वापरला जातो. यात अनेक समज-गैरसमज पाहायला मिळतात. दिवसभर उपाशी राहणे आणि उपवास यात फार फरक आहे. जर तुम्ही परमेश्वरासाठी उपवास करत असाल तर त्यासाठी त्याचे स्मरण, त्याच्याशी साधलेला संवाद आणि त्याच्या पवित्र विचारांचा मनन गरजेचे असते. यामागचा उद्देश्य म्हणजे परमेश्वराने केलेल्या कार्याचा गौरव होणे. या दिवशी साधारण सात्त्विक आहार करणे गरजेचे असते. तसेच शरीराला विशेष कष्ट न देता शरीराने आणि मनाने त्याच्या जवळ राहाणे म्हणजेच उपवास असे मानले जाते. उप-वास म्हणजे मन आणि शरीर शुद्धीचा एक यज्ञ आहे, असेही म्हटले जाते. 

आणखी वाचा : Navratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप

पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रात रोज उपवास करण्याची प्रथा आहे. त्यातही महाष्टमी आणि महानवमीच्या दिवशी उपवासाला विशेष महत्त्व आहे. काही उपासक तर महाष्टमीला निर्जळी उपवास करतात. सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ हलका आणि मित आहार घेणे असा केला जातो. उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे. 

बृहदारण्यकात परमेश्वराप्रत जाण्याचे जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात उपवासाचाही निर्देश आहे. यज्ञ, तप, दान आणि उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे मार्ग आहेत. महाष्टमीच्या दिवशी उपवास केल्यामुळे शरीरातील मांद्य- आळस कमी होतो आणि देवी उपासनेत मन एकाग्र करणे सुलभ जाते. म्हणून उपवास करायचा असतो. 

आणखी वाचा : नवरात्रोत्सवात अष्टमीला फार महत्त्व का दिले जाते?

निर्जळी उपवास चुकीचा

आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे निर्जळी म्हणजे पाणी न पिता उपवास करणे हे अजिबात योग्य नाही. उपवास करताना ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या दरम्यान एखादी विशिष्ट गोष्ट खायला हवी असाही काही नियम नसतो. फक्त या दिवशी आपल्या पोटाला आराम मिळेल असे हलके पदार्थ खावेत असे अनेकदा सांगितले जाते. सध्याच्या काळात उपवास म्हणजे पोटाला एक दिवस आराम देणे असे समजले जाते, ते काही अंशी खरेही आहे. 

देवीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण देवीची पूजा आणि उपासना करत असतो. देवी ही शक्ती आहे. आपणही सतत चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत राहिले पाहिजे. देवीने दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपणही आपल्यातील आळस, अस्वच्छता, असूया, अज्ञान, अनारोग्य, अंधश्रद्धा, अनीति, अपव्यय आणि आसक्ती या नऊ दोषांचा नाश करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

सर्वमंगलमागल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥ या देवी सर्वभूतेषु बुद्धीरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥ हा श्लोक ऐकला तरी फार प्रसन्न वाटते. त्याचप्रमाणे नवरात्रीदरम्यान सर्व ठिकाणी वातावरणात एक प्रसन्नता पाहायला मिळते. तसेच मंदिरांमध्ये आणि घरोघरी दुर्गादेवीचे मनोभावे पूजन केले जाते, उपासना केली जाते. त्यातील उपवास हे देवीच्या उपासनेतील एक महत्त्वाचे साधन आहे.