‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रमोशनसाठी कलाकार ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाले होते. कपिलनं साराला शिक्षणाबद्दल विचारलं असता, तिनं इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला असल्याचं सांगितलं. चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना आदित्य आणि साराची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता आहे.