परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध नैसर्गिकरित्या निर्माण झालेले जांभूळबेट हे जिल्ह्यातील पर्यटनाचा आकर्षणबिंदू ठरणार असून चहूबाजूंनी अथांग जलाशय आणि गर्द झाडीत…
विशाल आर्वीकर यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावरचा हल्ला प्राणघातक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…