21 January 2021

News Flash

‘सीआयआय’चा परिमंडळ विस्तार; ठाण्यात संघटनेचे नवे कार्यालय

‘सीआयआय’ने महाराष्ट्रात परिमंडळ विस्तार केला

उद्योगांचे राष्ट्रीय स्तरावर संघटन करणाऱ्या भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात ‘सीआयआय’ने महाराष्ट्रात परिमंडळ विस्तार केला असून याअंतर्गत ठाण्यात नवे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नव्या परिमंडळाची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने सिमेन्सचे उपाध्यक्ष सतीश गोडबोले तर उपाध्यक्ष म्हणून हर्कूलिस हॉईस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयआयचे हे राज्यातील सातवे कार्यालय आहे.
यापूर्वी औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे येथे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सीआयआयचे ८४ सदस्य या परिमंडळातील असून नव्या कार्यालयाच्या अखत्यारीत ठाणे जिल्ह्य़ातील तब्बल ११ औद्योगिक नगरी व तीन विशेष आर्थिक क्षेत्र येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 8:12 am

Web Title: cii sets up a new zonal office in thane
Next Stories
1 ‘डॅटसन रेडी गो’ची नोंदणी सुरू
2 टोयोटाच्या नव्या इनोव्हा क्रिस्टाचा ‘कॉर्पोरेट कनेक्ट’!
3 स्थावर मालमत्तेला कोटय़वधींच्या निधीचा टेकू
Just Now!
X