News Flash

शेअर बाजाराचा आगामी मार्ग..

शेअर बाजाराची दिशा काय असेल, याचा अंदाज वर्तविणे नेहमीच कठीण असते. तेजी-मंदी २०१३ मध्ये नक्कीच अनुभवयास मिळणार आहे आणि तिचे प्रमाण २०१२ पेक्षा अधिक असणार

| January 17, 2013 04:41 am

शेअर बाजाराची दिशा काय असेल, याचा अंदाज वर्तविणे नेहमीच कठीण असते. तेजी-मंदी २०१३ मध्ये नक्कीच अनुभवयास मिळणार आहे आणि तिचे प्रमाण २०१२ पेक्षा अधिक असणार आहे. पण या तेजी-मंदीच्या लाटेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांनी करावा. अशा चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी सज्ज असलेले ‘फ्लेक्सी कॅप डायनॅमिक फंड’सारखे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आपल्या मूलभूत ‘पोर्टफोलिओ’चा भाग जरूर बनवावेत.
२०१२ मध्ये ‘इक्विटी मार्केट’मध्ये थोडे चढ-उतार आले. पण त्यातूनही अपेक्षेपेक्षा जरा अधिकच, वार्षकि अंदाजे २५% हून अधिक उत्पन्न मिळाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताने या कॅलेंडर वर्षांत चांगली कामगिरी केली. सरकारने वित्तीय व चालू खात्यातील तूट यावर अंकुश ठेवण्यासाठी यशस्वी ठरलेल्या अतिशय गरजेच्या सुधारणा केल्यामुळे आणि त्यामुळे घसरण होण्याची तातडीची शक्यता टाळल्याने शेअर बाजाराला चालना मिळाली. तसेच, मान्सून चांगला झाल्याने आणि ‘क्यूई३’ची घोषणा होऊनही जागतिक स्तरावर तेलाच्या भावात वाढ न झाल्याने शेअर बाजारात आणखी उत्साह आला.
पण २०१३ च्या दिशेने वाटचाल करत असताना दोन्ही प्रकारची तूट नियंत्रणात ठेवणे आणि आíथक वृद्धीदर साध्य करण्याचा प्रयत्न करणे यावर वर्षभर भर असणार आहे. हे निवडणुकीपूर्वीचे वर्ष असल्याने सरकारच्या निर्णयांवर प्रभाव असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक असेल, तो म्हणजे राजकीय चित्र.
रिटेलमधील थेट परकीय गुंतवणूक, इंधनाची दरवाढ आदी महत्त्वाच्या सुधारणांवर सरकार भर देत असले तरी त्यातून वित्तीय दृढीकरण हा हेतू स्पष्ट होतो. ढोबळ आíथक स्थितीमध्ये सुधारणा होत असताना, वित्तीय व चालू खात्यावरील तूट यातील दृढीकरण, चलनवाढीच्या दरात घट आणि वाढीला चालना या बाबतीत आणखी ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. निर्गुतवणुकीऐवजी अतिरिक्त करआकारणी आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ अशा अन्य पर्यायांतून वित्तीय तूट कमी केल्यास शेअर बाजारावर परिणाम होईल आणि शेअर बाजारात आणखी तेजी येण्यासाठी कदाचित मोठा सकारात्म परिणाम होऊ शकतो. वित्तीय दृढीकरणावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, कारण यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेला वाढीला अनुकूल भूमिका घेण्यासाठी वाव मिळेल आणि व्याजदरात कपात करण्याचे वर्तुळ सुरू होईल. गेल्या वर्षांतील महत्त्वाचा बदल म्हणजे, अमेरिकेतील तेल उत्पादनात झालेल्या वाढीमुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे निर्माण होणारी चिंता आता दूर झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला खनिज तेलाच्या कमी दरामुळे फायदा होतो आणि हे दर प्रती बॅरल १०० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी असतील तर भारतातील इक्विटीला फायदा होतो. परंतु, यावर रुपयाच्या अवमूल्यनामुळे थोडे विरजण पडले आणि पुढील काळातही हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे.  
भारतीय गुंतवणूकदारांनी ‘इक्विटी’मध्ये पुरेशी गुंतवणूक न करणे कायम ठेवले आहे आणि त्यांचे यातील योगदान फारच कमी आहे. याउलट, देशाच्या काही भागांत प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्राचे दर अत्यंत चढे आहेत आणि ते गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.
गुंतवणूकदारांना आमचा सल्ला आहे की, अर्थव्यवस्थेत जेव्हा व्याजात कपात होते, करआकारणीमध्ये वाढ होते व या दोन्ही गोष्टी वित्तीय दृढीकरणाशी थेट जोडलेल्या असतात तेव्हा गुंतवणूकदारांनी ‘इक्विटी’तील गुंतवणुकीच प्रमाण वाढवावे.
मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या संधींचा लाभ घेत असताना, मूल्यांकनामध्ये अजूनही द्विभाजन कायम दिसते ज्यामुळे एफएमसीजी, फार्मा आणि निवडक बँकिंग शेअर्स, विस्तृत शेअर बाजार आकर्षक वाटत राहतो. आमच्या मते, गुंतवणूकदारांना पुढील वर्षी जोखीम गृहित धरून उत्पन्नाचा विचार करता तीन घटक मदतीचे ठरणार आहेत, ते म्हणजे चढ-उतार, पायाभूत सुविधा आणि संपत्तीची विभागणी. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करू.
शेअर बाजाराची दिशा काय असेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. परंतू तेजी-मंदी या कालावधीत नक्कीच अनुभवण्यास मिळणार आहे आणि त्याचे प्रमाण २०१२ पेक्षा अधिक असणार आहे, म्हणजे शेअर बाजार एकदिशेला जाणारा नसेल. जागतिक पातळीवर, अर्थव्यवस्था कर्जाची परतफेड करण्याच्या चक्रातून जात आहेत. अशा परिस्थितीत ‘इक्विटी’ क्वचितच एकदिशेने चांगले उत्पन्न देतात. त्यामुळे, तेजी-मंदीचे प्रमाण वाढत असताना गुंतवणूकदारांनी या लाटेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा चढ-उतारांचा लाभ फंड म्युच्युअल फंड देऊ करतात. म्हणूनच ‘फ्लेक्सी कॅप डायनॅमिक फंड’ सारखे पर्यायांना मूलभूत ‘पोर्टफोलिओ’मध्ये स्थान देण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.  
पायाभूत सुविधांचा प्रश्न बराच जुना आणि सततचा प्रश्न आहे आणि त्यावर आता तातडीने उपाय करणे गरचेजे आहे. वित्तीय तुटीच्या बाबतीत सुधारणा झाल्यास त्यामध्ये वाढत्या व्याजदरामुळे होत असलेल्या खर्चामुळे भरडल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा कंपन्यांनाही लाभ देण्याची क्षमता आहे. दुचाकी आणि कारच्या कमी झालेल्या विक्रीतून खपामध्ये वा लोकांकडून होत असलेल्या उपभोगामध्ये मंदी आल्याचे आधीच स्पष्ट झाले असून उपभोग क्षेत्राकडून पायाभूत सुविधेच्या दिशेने बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ‘एसआयपी’मार्फत पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना तीन वर्षांहून अधिक अशा दीर्घकाळात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून संपत्तीचे विभाजन करणे. व्याजदरात कपात होण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने दीर्घकालीन गिल्ट आणि इन्कम अशा २४ ते २६ महिने गुंतवणूक कालावधी असलेल्या पर्यायांत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आपला गुंतवणूक ‘पोर्टफोलिओ’ आणखी चांगला करण्यासाठी मदत होईल.
२०१२ या वर्षांत कठीण निर्णय घेतले गेले आणि वित्तीय दृढीकरणाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. योग्य सुरुवात करणे म्हणजे निम्मे काम करण्यासारखे आहे. परंतू वित्तीय दृढीकरणाचा मार्ग २०१३ मध्ये सातत्यपूर्ण कृती आणि सुधारणांची अमलबजावणी यामार्फत चोखाळला तरच हे शक्य आहे.

(लेखक आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड कंपनीच्या इक्विटी आणि फिक्स इन्कम विभागाचे अधिकारी आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 4:41 am

Web Title: future way of share market
टॅग : Sensex,Share Market
Next Stories
1 चिंतेने निर्देशांकाची ची १६९ अंशांनी घसरण
2 कोठारी यांचा बुलियन संघटनेविरुद्ध मानहानीचा २०० कोटींचा दावा
3 उद्योगअग्रणी महाराष्ट्राला ‘ब्रॅण्डिंग’ हे उशीरा सुचलेले शहाणपण – ठाकूर
Just Now!
X