03 March 2021

News Flash

२० हजारापासून निर्देशांकाची माघार

सलग तीन दिवसांच्या तेजीसह तीन महिन्यांपूर्वीच्या उच्चांकाला पुन्हा सर करणाऱ्या भांडवली बाजारात गुरुवारी गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी केलेली विक्री शिरजोर ठरली. काल ‘सेन्सेक्स’ २० हजाराच्या पातळीला स्पर्श

| May 10, 2013 02:38 am

सलग तीन दिवसांच्या तेजीसह तीन महिन्यांपूर्वीच्या उच्चांकाला पुन्हा सर करणाऱ्या भांडवली बाजारात गुरुवारी गुंतवणूकदारांनी नफ्यासाठी केलेली विक्री शिरजोर ठरली. काल ‘सेन्सेक्स’ २० हजाराच्या पातळीला स्पर्श करून, १९९९० वर बंद झाला होता. आज पुन्हा त्याने २० हजाराला गाठले आणि  तेजी-मंदीवाल्यांच्या धुमश्चक्रीत दिवसभर या निर्देशांकाची २० हजाराच्या अल्याड-पल्याड रस्सीखेच सुरू राहिलेली दिसली.
मात्र शेअर बाजाराने सकाळच्या सत्रात मिळवलेली बढत बंद होताना टिकली नाही. सेन्सेक्स उघतानाच २०,०१५.८६ वर उघडला व लगेचच दिवसभराच्या उच्चांकावर २०,०५८.४८ वर पोहचला. पण या पातळीवर काही आघाडीच्या समभागांमध्ये वरच्या भावावर नफा कमावण्यासाठी विक्रीला जोम चढला. तरी तेजीवाल्यांकडून निरंतर खरेदीचा जोर सुरू राहिल्याने आजच्या कारभारात सेन्सेक्स कालच्या बंद भावाच्या तुलनेत निरंतर वर-खाली होताना दिसला.
मात्र कारभाराच्या उत्तरार्धात सेन्सेक्सने १९,९०३.४३ चा तळ गाठला व बंद होताना ५१.१४ अंश घसरून १९९३९.०४ वर तो बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गुरुवारच्या कारभारात ६०४८.७०चा दिवसभरातील सर्वोच्च स्तर गाठत निफ्टी दिवसअखेर १९.१५ अंशांनी घसरून ६०५०.१५वर बंद झाला.
स्टेट बँक, टीसीएस विप्रो िहडाल्को, आयटीसी हे वधारणारे तर रिलायन्स, सिप्ला, स्टरलाइट, जिंदल स्टील, सन फार्मा हे घटणारे शेअर होते. क्षेत्रीय निर्देशांकात आयटी, तंत्रज्ञान, सार्वजनिक उद्योग हेनिर्देशांक वर तर स्थावर मालमत्ता, धातू व आरोग्य निगा हे निर्देशांक खाली बंद झाले.

शनिवारी-सोमवारी बाजारात विशेष व्यवहार सत्रे
शनिवार ११ मे रोजी सकाळी ११.१५ ते १२.४५ या वेळेत दोन्ही बाजारांचे विशेष सत्र होणार आहे.  बाजाराच्या संगणक प्रणालीची आपत्कालीन चाचणी घेण्यासाठी हे सत्र आयोजित केल्याचे मुंबई शेअर बाजाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तर सोमवारी १३ मे रोजी अक्षय्य तृतीयेनिमित्त बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात सकाळी ९.१५ ते ३.३० या नियमित कारभाराच्या सत्राव्यतिरिक्त, सायंकाळी ४.३० ते ७.०० वाजेपर्यंत सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी केवळ ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी विशेष विस्तारीत सत्र योजण्यात आले आहे. विशेष बाब म्हणून या सत्रात गोल्ड ईटीएफमध्ये व्यवहारावर उलाढाल शुल्क संपूर्ण माफ करण्याची घोषणा दोन्ही शेअर बाजारांनी केली आहे.

‘२०१२-१३ आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले निकाल जाहीर होत आहेत. म्हणून निफ्टी ६,०००च्या वर आणि सेन्सेक्स २०,०००च्या जवळपास रेंगाळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतीय विमा कंपन्या व म्युच्युअल फंडांनी ३९,००० कोटींची विक्री केली आहे, त्या उलट विदेशी अर्थसंस्थानी  ४७,००० कोटीची खरेदी केली आहे. ताजी तेजी पाहता कुंपणावर बसलेले किरकोळ गुंतवणूकदार पुढील आठवड्यात बाजारात प्रवेश करताना दिसतील. अजून म्हणावे तशी या वर्गाची बाजारात उपस्थिती दिसत नाही. हा वर्ग जोवर कारभारात मोठ्या प्रमाणावर भाग घेताना दिसत नाही तोवर तेजीची अपेक्षा करता येणार नाही. २०१३ अखेरपर्यत सेन्सेक्स २०,६००-२०,८०० दरम्यान राहील.’
’ सोनाली शहा, एडेल्वाईस वेल्थ मॅनेजमेंट  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 2:38 am

Web Title: sensex rangebound at around 20000 points
Next Stories
1 बँकांच्या निकालाचे संमिश्र पडसाद
2 बाजारात नवे काही..
3 अंबरनाथमध्ये वाल्व्होलाइन कमिन्सचा वंगणनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित
Just Now!
X