05 April 2020

News Flash

विक्रमांचा षटकार!

विद्यमान आर्थिक वर्षांच्या मावळतीला आणि हिंदू नववर्षांच्या प्रारंभाला अर्थव्यवस्थांची प्रतिकेही सोमवारी काहीशी उजळून निघाली.

| April 1, 2014 01:02 am

विद्यमान आर्थिक वर्षांच्या मावळतीला आणि हिंदू नववर्षांच्या प्रारंभाला अर्थव्यवस्थांची प्रतिकेही सोमवारी काहीशी उजळून निघाली. सेन्सेक्स अन् निफ्टीने त्यांचा नवा उच्चांक नव सप्ताहारंभालाही कायम ठेवला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सलग सहाव्या व्यवहारात विक्रमी तेजी नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व्यवहारात २२,४६७.१ वर पोहोचला. तर दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत ४६.३० अंश वाढ होऊन २२,३८६.२७ हा टप्पा राखला गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ८.३० अंश वाढीसह महिना, आर्थिक वर्षअखेर ६,७०४.२० या सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.
भांडवली बाजाराने सलग सहाव्या व्यवहारात विक्रमी झेप राखली आहे. यापूर्वीच्या सलग पाचही सत्रात दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांचा सर्वोच्च टप्पा पार केला होता. चालू आर्थिक वर्षांच्या अखेरच्या क्षणीही हाच कित्ता कायम राहिला. निफ्टीनेही नव्या वर्षांपूर्वीच्या सत्रात ६,७३.०५ पर्यंत झेपावला होता.
२०१३-१४ च्या एकटय़ा मार्चमध्ये सेनस्ेक्स १,२६६.१५ अंश भर नोंदविता झाला आहे. ऑक्टोबरनंतरच ही सर्वात मोठी कामगिरी राहिली आहे. तर या सपूर्ण आर्थिक वर्षांत ३,५५०.५० अंश वाढ राखली गेली आहे. २८ मार्चपर्यंत सेन्सेक्समध्ये १८.८ टक्के भर पडली आहे. रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारच्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या आशेवर गुंतवणूकदारांची बाजारातील खरेदी कायम राहिली. शुक्रवारीही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांन १,३६२.८७ कोटी रुपयांची खरेदी केली.
भांडवली बाजारातील २०१३-१४ च्या अखेरच्या दिवशीही डॉलरसह परकी चलनातील निधीचा ओघ विदेशी गुंतवणूकदारांनी कायम ठेवला. परकी चलन व्यवहार सोमवारी बंद असले तरी डॉलरच्या तुलनेतील रुपया ६० च्या वर असून सहाव्या महिन्याच्या उच्चांकावर कायम राहिला आहे. याच आर्थिक वर्षांत चलनावर ६८ पर्यंत अवमूल्यित होण्याचा बाका प्रसंग ओढवला आहे. तर मार्च २०१४ अखेर चालू खात्यावरील तूट कमी होण्यासह विदेशी गंगाजळीचे प्रमाण वाढण्याची आशा नव्या वर्षांच्या प्रारंभीदेखील कायम असेल.
चालू आर्थिक वर्षांत भांडवली बाजारातील रोख्यांमध्ये ८० हजार कोटी रुपयांचा निधी ओतला आहे. अर्थात ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षांतील १,४० लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्याकडून सलग पाचव्या आर्थिक वर्षांत हात रिता केला गेला आहे. २००८-०९ मध्ये त्यांच्याकडून ४७७०६ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. मार्च २०१३ अखेर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची संख्याही कमी झाली आहे. ती आता १,७१० होती. मार्च २०१२ अखेर १,७५७ होती. उप खात्यांची संख्याही बाजारात ६,३४४ राहिली आहे. २०१२-१३ मध्ये ६,३३५ मध्ये होती. उप खात्यांमध्ये विदेशी संस्था, वैयक्तिक गुंतवणूकदार, संस्था यांचा समावेश आहे. ते विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांसाठी बाजारात व्यवहार करतात.
चालू आर्थिक वर्षांत मात्र या गुंतवणूकदारांनी रोखे बाजारातून २८ हजार कोटी रुपये काढून घेतले. गेल्या आर्थिक वर्षांतही जवळपास यापेक्षा किरकोळ अधिक, २८,३३४ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.
भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना बाजारपेठ खुली केल्यानंतर म्हणजे १९९२ च्या दरम्यान समभागांमधील गुंतवणूक ७.०८ लाख कोटी रुपये झाली आहे. तर याच दरम्यान काढून घेण्यात आलेली रक्कम ही १.४० लाख कोटी रुपये आहे.
२०१३-१४ च्या पहिल्या दोन महिन्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात योगदान दिले. केंद्र सरकारच्या अर्थविषयक धोरणाच्या पाश्र्वभूमिवर त्यांनी व्यक्त केलेला हा विश्वास होता. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय घडामोडींनी चिंतीत होत त्यांनी बाजारात काही काळ अस्वस्थता पसरवली. मात्र मार्चमध्ये पुन्हा ते परतले.
केंद्र सरकार चालू खात्यावरील तूट कमी करण्यात यश मिळवेल आणि महागाई अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नाही, हे हेरून रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर वाढ करणार नाही, ही आशा बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण करत आहे.

फेब्रुवारीचा किरकोळ किंमतींवर आधारित महागाईचा दर ८.१ टक्के या २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर असला तरी राजकीय अस्थिरता, पावसाचा अंदाज यांचा प्रभाव पतधोरणावर राहणार आहे. रिझव्‍‌र्ह बँक जून महिन्यापर्यंतचे अर्थविषयक अंदाज व्यक्त करून कदाचित थांबेल.  
– मलय शहा,
स्थिर उत्पन्न गुंतवणूक प्रमुख, पिअरलेस म्युच्युअल फंड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2014 1:02 am

Web Title: sensex touches life time high nifty sets record
Next Stories
1 संक्षिप्त व्यापार : ‘आरकॉम’चा आंतरराष्ट्रीय रोमिंग बोनान्झा
2 ‘बॅसल-३’ला मुदतवाढ; रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाने बँकांवरील ताण हलका
3 विक्रमी आगेकूच सुरूच!
Just Now!
X