03 June 2020

News Flash

स्पाइसजेटच्या मुंबईतील उड्डाणांच्या वक्तशीरपणात सुधार

स्पाइसजेटने आर्थिक आघाडीवरील समस्यांवर मात करतानाच, आपल्या सेवा गुणवत्तेत उत्तरोत्तर सुधार केला आहे

किफायती हवाई सेवा प्रदाता कंपनी स्पाइसजेटने आर्थिक आघाडीवरील समस्यांवर मात करतानाच, आपल्या सेवा गुणवत्तेत उत्तरोत्तर सुधार केला आहे. काही महिन्यांपर्यंत उड्डाणे विलंबाने होणे व रद्द होणे अशा समस्या असलेल्या तिच्या सेवेची सध्याची उड्डाण कामगिरीही सुधारली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (मियाल) कडून प्राप्त आकडेवारीनुसार स्पाइसजेट येथील विमानतळावरील वेळेत उड्डाणांची मात्रा (ओटीपी) गुणांक सरलेल्या सप्टेंबरमध्ये उत्तरोत्तर उंचावत ८५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. कधी काळी वक्तशीरपणासाठी आघाडीवर असलेल्या स्पाइसजेटने ही प्रवाशांना वेळेत उड्डाणाची हमी आणि त्याचे पालन न झाल्यास आर्थिक भरपाई देणारी अनोखी योजना सुरू केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2015 7:31 am

Web Title: spice jet service in mumbai improves
टॅग Business News
Next Stories
1 बाजारातील घसरण विस्तारली; सेन्सेक्स २७ हजारापासून दूर
2 राज्यातील ५५ हजार औषध विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग
3 जपानच्या निप्पॉन लाइफचा रिलायन्स कॅपिटलमध्ये निम्मा हिस्सा
Just Now!
X