एअर इंडियाने अहमदाबाद आणि नेवार्क या दोन ठिकाणांना लंडनमार्गे जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली. ही सेवा १५ ऑगस्ट २०१६ पासून चालू होईल.
बी-७८७ ड्रीमलायनर विमान वापरात येणारी ही विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी आठवडय़ातून तीनदा उपलब्ध असेल. १० सप्टेंबर २०१६ पर्यंत या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सवलतीचे विमान भाडे जाहीर करण्यात आले आहे. या विमानसेवेमुळे अहमदाबादमधल्या काम, व्यवसाय तसेच आरामाच्या निमित्ताने लंडन आणि नेवार्कला जाणाऱ्या तब्बल ६ लाख जणांची सोय होणार आहे.