News Flash

बाजाराचा तंत्र कल : ही चाल तुरु तुरु..

उराशी बाळगलेली स्वप्नं ही तेजीतच प्रत्यक्षात येऊ शकतात. कागदोपत्री नफा हा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखा असतो.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या सप्ताहातील पूर्वार्धात हलकीशी घसरण निर्देशांकावर आलीय. पण तरी जराही विचलित निफ्टी निर्देशांकाने तेजीची ‘तुरु तुरु चाल’ कायम राखत गुरुवारी १२,२८२ चा ऐतिहासिक उच्चांकी बंद भाव नोंदविला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४१,४६४.६१

निफ्टी : १२,२२६.७०

गेल्या आठवडय़ात निर्देशांकांनी आपले तेजीचे पहिले वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४१,८०० आणि निफ्टीवर १२,३०० साध्य केल्याने, या स्तरावर गुंतवणूकदारांनी समभाग खरेदी करण्यापेक्षा, समभागांच्या नफारूपी विक्रीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

उराशी बाळगलेली स्वप्नं ही तेजीतच प्रत्यक्षात येऊ शकतात. कागदोपत्री नफा हा ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’सारखा असतो. तेव्हा सेन्सेक्सच्या ४२,५०० ते ४३,५०० आणि निफ्टीच्या १२,५०० ते १२,८०० या शिखर स्तरांच्या मृगजळामागे धावण्यापेक्षा, निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्प्यावर २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात नफ्यात असलेल्या समभागांची विक्री करून तो नफा गाठीशी बांधत जाणे श्रेयस्कर ठरेल.

आगामी तिमाही निकालांकडे..

१) इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लि.

* तिमाही निकाल – शुक्रवार, १० जानेवारी

* शुक्रवार, ३ जानेवारीचा भाव – ७४६.१० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ७२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : ७२५ रुपयांचा स्तर राखत समभागाचे पहिले वरचे लक्ष्य ७६० रुपये. भविष्यात ७२५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८२० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७२५ ते ७६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : ७२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ६८० व त्यानंतर ६२० रुपयांपर्यंत घसरण

२) टाटा एलेक्सी लिमिटेड

* तिमाही निकाल – सोमवार, १३ जानेवारी

*  शुक्रवार, ३ जानेवारीचा भाव- ८३८.१० रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – ८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये. भविष्यात ८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ९३० ते १,००० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ८०० ते ९०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७३० रुपयांपर्यंत घसरण.

३) इंडसइंड बँक

*  तिमाही निकाल – मंगळवार, १४ जानेवारी

*  शुक्रवार, ३ जानेवारीचा भाव- १५२९.६५ रु.

* निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – १,४८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४८० रुपयांचा स्तर  राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५५० रुपये. भविष्यात १,४८०  रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,६०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,४८० ते १,५५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,४८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४३० रुपयांपर्यंत घसरण

४) विप्रो लिमिटेड

*  तिमाही निकाल – मंगळवार, १४ जानेवारी

*  शुक्रवार, ३ जानेवारीचा भाव- २५०.८० रु.

*  निकालानंतरचा केंद्रबिंदू स्तर – २५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७५ रुपये. भविष्यात २५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : २५० ते २७५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशाजनक निकाल : २५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम २२५ व त्यानंतर २०० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 4:10 am

Web Title: sensex market nifty index up sharply abn 97
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : डेट फंडांचे बहारदार गुच्छ 
2 करबोध : कर नोटीस आली तर..
3 बंदा रुपया : निर्यातक्षम मातबरी
Just Now!
X