२००७ ते २०१७ या काळात भारतातील वाहन उद्योग १० टक्के वार्षिक दराने वाढला. वाहन उद्योगाने जगभरातील सर्वाधिक वाढ भारतात अनुभवली आहे. मारुतीची व्हिटारा, ब्रेझ्झा, एस क्रॉस, इग्निस, महिंद्र केयूव्ही यांसारख्या वाहनांसाठी गॅब्रियल इंडिया ‘डेडिकेटेड सप्लायर’ आहे. याचा अर्थ या वाहनांसाठी जे सुटे भाग गॅब्रियल इंडिया पुरवते त्या भागांसाठी अन्य कुठलाही पुरवठादार नाही. दोन आणि तीनचाकी वाहनांच्या तुलनेत चारचाकी प्रवासी वाहनांसाठी ‘डेडिकेटेड सप्लायर’च्या नफ्याचे प्रमाण अधिक असते.
गॅब्रियल इंडिया ही आनंद समूह आणि गॅब्रियल यूके यांची संयुक्त कंपनी आहे. आनंद समूह हा भारतातील वाहननिर्मात्यांसाठी पूरक उत्पादने तयार करणारा समूह असून विक्रीपश्चात दुरुस्ती बाजारपेठेत आपला दबदबा राखून असलेला समूह आहे. भारतात सन २००० पश्चात सुरू झालेल्या वाहन क्रांतीचा एक प्रमुख लाभार्थी आहे. आनंद समूहाचे ११ राज्यांतील ६२ ठिकाणी उत्पादन प्रकल्प असून एकूण विक्रीपैकी १० टक्के विक्री निर्यातीतून होते. जगभरातील प्रमुख वाहन निर्मात्यांना आंदन समूह सुटय़ा भागांचा पुरवठा (ओईएम) करतो.
गॅब्रियल इंडिया प्रामुख्याने सुरक्षा उपकरणे (सीट बेल्ट), ट्रान्समिशन सिस्टम, चॅसिस सिस्टम, एअर फिल्ट्रेशन, फ्यूएल फिल्ट्रेशन व अन्य सुटय़ा भागांची वाहन उत्पादकांसाठी निर्मिती करते. वाहन उद्योगांव्यतिरिक्त गॅब्रियल इंडिया ही कंपनी भारतीय रेल्वेची मान्यताप्राप्त पुरवठादार आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी आणि मालवाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून २०२० पर्यंत प्रवासादरम्यान हादरे न बसणारे प्रवासी रेल्वे डबे, अधिक अश्वशक्तीची इंजिने यासाठी भांडवली खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करीत असून सरकारच्या या प्रकल्पाची गॅब्रियल इंडिया प्रमुख लाभार्थी आहे.
मारुती, महिंद्र, ह्य़ुंडाई, मर्सिडीज बेन्झ यांसारखे प्रमुख वाहन उत्पादक भारतीयांची बदलती प्राधान्ये लक्षात घेऊन आपल्या वाहनांची नवीन मॉडेल्स उपलब्ध करून देत आहेत. मारुतीची व्हिटारा, ब्रेझ्झा, एस क्रॉस, इग्निस, महिंद्र केयूव्ही यांसारख्या वाहनांसाठी गॅब्रियल इंडिया ‘डेडिकेटेड सप्लायर’ आहे. याचा अर्थ या वाहनांसाठी जे सुटे भाग गॅब्रियल इंडिया पुरवते त्या भागांसाठी अन्य कुठलाही पुरवठादार नाही. दोन आणि तीनचाकी वाहनांच्या तुलनेत चारचाकी प्रवासी वाहनांसाठी ‘डेडिकेटेड सप्लायर’च्या नफ्याचे प्रमाण अधिक असते.
पाठोपाठचे दुसरे वर्ष पुरेशा पावसामुळे आणि कृषी उत्पादनांसाठी किमान आधारभूत किमतीत मर्यादित वाढ करण्याच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांसाठी उपकारक ठरले आहे. ग्रामीण भारताची क्रयशक्ती त्यामुळे वाढणार आहे. या वाढीव क्रयशक्तीचा वाहन उद्योग प्रमुख लाभार्थी आहे. गॅब्रियल इंडियाच्या एकूण विक्रीपैकी ८२ टक्के विक्री मूळ वाहन उत्पादकांना (ओईएम) पुरवठय़ातून होत असल्याने वाहन उद्योगाच्या वाढीचा फायदा या कंपनीला होणार आहे. नवीन आर्थिक वर्षांत रेल्वेकडून वेगवान प्रवासी वाहतुकीच्या डब्यासाठी लागणाऱ्या सुटय़ा भागाची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे. वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणारे एलएचबी (Linke Hofmann Busch) प्रवासी डबे हे सध्या अॅल्स्टोममार्फत जर्मनीहून आयात होतात. सध्या आयात होत असलेल्या डब्यांना पर्याय म्हणून या डब्यांचे स्थानिक उत्पादन रेल्वेच्या इंटीग्रेटेड कोच फॅक्टरी, कपुरथळा येथे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सुरू होत आहे. या डब्यांसाठी वापरले जाणारे ‘शॉक अॅब्सॉर्बर्स’ गॅब्रियल इंडियाने रेल्वेसाठी विकसित केले आहेत. सध्या कमी प्रमाणात उत्पादन होत असलेल्या या डब्यांची संख्या भविष्यात वाढणार आहे.
२००७ ते २०१७ या काळात भारतातील वाहन उद्योग १० टक्के वार्षिक दराने वाढला. वाहन उद्योगाने जगभरातील सर्वाधिक वाढ भारतात अनुभवली आहे. वाहन उत्पादकांची शिखर संघटना असलेल्या ‘सियाम’ने ऑटोमोबाइल मिशन प्लान या नावाने मार्गदर्शनपर एक धोरण मसुदा प्रसिद्ध केला आहे. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या मसुद्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या आहेत. या अहवालानुसार वाहन उत्पादकांनी पाच बाबींवर लक्ष केंद्रित करण्यावर वाहन उत्पादकांचे एकमत झाले आहे. प्रवाशांची सोय, वाहनांचा दर्जा वाढविताना उत्पादन खर्च कमी करून ग्राहकाला परवडणारी किंमत ठेवणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणून २०१७ ते २०१८ या कालावधीत वाहन उद्योगाने दोन आकडी वृद्धिदर गाठण्यात दिसून येईल. या वृद्धिदराचा लाभार्थी असलेल्या गॅब्रियल इंडियाला आपल्या गुंतवणुकीत स्थान हवे.
गॅब्रियल इंडिया लि.
(बीएसई कोड ५०५३५५)
मिड कॅप
प्रवर्तक : सुमंत पटेल
बाजारभाव (रु.) १७५.४०
पुस्तकी मूल्य (रु.) ३१.४०
दर्शनी मूल्य (रु.) १/-
५२ आठवडय़ातील १८१.४५ /
उच्चांक/ नीचांक (रु.) ९९.६०