आशीष ठाकूर

गेल्या पंधरवडय़ापासून जी बाजारात अतिजलद तेजी चालू होती तिचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,००० ते ३५,३५० आणि निफ्टीवर १०,३५० ते १०,४५० चे होते. हे लक्ष्य साध्य झाल्यावर एक घसरण अपेक्षित होती. ती सरलेल्या सप्ताहातील बुधवार आणि गुरुवारी येऊन गेली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३५,१७१.२७

निफ्टी : १०,३८३.००

येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सने ३४,००० आणि निफ्टीवर १०,००० असे स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास या तेजीचे प्रथम वरच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,००० ते ३७,३५० आणि निफ्टीवर १०,७५० ते १०,८५० असे असेल. आणि त्या नंतरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,७५० ते ३८,१५०आणि निफ्टीवर ११,००० ते ११,१०० असेल. या स्तरावर गुंतवणूकदारांना अतिशय सावध होण्याची गरज आहे. या स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून चालू असलेल्या तेजीला पूर्णविराम मिळून फार मोठय़ा घातक उताराची शक्यता असून त्या मंदीची दाहकता, व्याप्ती पुढील लेखात विस्तृतपणे जाणून घेऊया.

तिमाही निकालांचा  वेध..

१) सीईएससी लिमिटेड

* तिमाही निकाल – सोमवार, २९ जून

* २६ जूनचा बंद भाव – ६०७.४० रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू – ६०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५० रुपये. भविष्यात ६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६०० ते ६५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५२० रुपयांपर्यंत घसरण.

२) एमआरएफ लिमिटेड

*  तिमाही निकाल – सोमवार, २९ जून

* २६ जूनचा बंद भाव – ६६,४०५.१० रुपये

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर –        ६४,००० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६४,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६७,५०० रुपये. भविष्यात ६४,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७०,००० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६४,००० ते ६७,५०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : निकालानंतर ६४,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६०,००० रुपयांपर्यंत घसरण.

३) नोसील लिमिटेड

*  तिमाही निकाल – सोमवार, २९ जून

*  २६ जूनचा बंद भाव- ८७.०५ रुपये

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १०० रुपये. भविष्यात ८५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १२० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ८५ ते १०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ८५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७२ रुपयांपर्यंत घसरण.

४) ओएनजीसी लिमिटेड

*  तिमाही निकाल – मंगळवार, ३० जून

* २६ जूनचा बंद भाव- ८४.१५ रुपये

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९५ रुपये. भविष्यात ८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ११० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ८० ते ९५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com