युलिप: गुंतवणूक न करण्याची पाच प्रमुख कारणे

बाजार निर्देशांक सर्वोच्च स्थानी आहेत. गुंतवणूकदारांचे मनोबलदेखील अत्यंत उंचावलेले आहे. अर्थात या बरोबरीने पुन्हा एकदा ट्रेडिंग टर्मिनलवरील क्रियाकलापांमध्येही तेजी आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमध्येही जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे.

बाजार निर्देशांक सर्वोच्च स्थानी आहेत. गुंतवणूकदारांचे मनोबलदेखील अत्यंत उंचावलेले आहे. अर्थात या बरोबरीने पुन्हा एकदा ट्रेडिंग टर्मिनलवरील क्रियाकलापांमध्येही तेजी आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमध्येही जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे. अशावेळी युलिपसारख्या बाजाराशी संबंधित उत्पादनांमध्ये रुची वाढली आहे. यावेळी ‘निश्चित खरेदी केले जाणाऱ्या’ सूचनांच्या आधारे जाऊ नये. उलट उत्पादन खरोखरच तुमच्याशी मेळ साधते का आणि तुम्हाला खरोखरच त्याची आवश्यकता आहे का हे पाहणे गरजेचे ठरेल. युलिपसारख्या योजनांमधील गुंतवणूक टाळायला हवी अशी पाच कारणे/परिस्थिती..

१ तुमचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे :
जर तुमचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आहे तर तुमच्या जीवन छत्राच्या मृत्यूदराचे शुल्क जास्त असू शकते. जस-जसे तुमचे वय वाढते तस-तसे हे शुल्कदेखील वाढते. बऱ्याच युलिप्समध्ये जीवन छत्र कमीत-कमी तुमच्या प्रीमियमच्या १० पट असते. जेणेकरून याला अधिनियम १०(१०डी)च्या लाभांकरिता योग्य बनविले जाऊ शकते. जर तुमचे ‘मॉर्टेलिटी प्रीमियम’ प्रमाण एकूण प्रीमियमपेक्षा अधिक असेल तर गुंतवणुकीमध्ये खूपच मर्यादित रक्कम जमा होईल. ही गुंतवणूक रक्कम दरवर्षी घटत जाईल. म्हणूनच जेव्हा तुमची पॉलिसी परिपक्व होईल तेव्हा तुमची ‘फंड व्हॅल्यू’ पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकित व्हाल. जास्त कालावधीच्या पॉलिसीमध्ये असे होण्याची संभावना अधिक असते, तर प्रीमियम भरणा कालावधी कमी असतो.

२ युलिप विमा नव्हे गुंतवणूक आहे :
युलिपची विक्री बऱ्याचदा विमा छत्रांतर्गत अनेक मध्यस्थांद्वारे केली जाते. वास्तविकत: युलिपचे स्वरूप हे जीवन विमाऐवजी एक गुंतवणूक म्हणून अधिक आहे. खरेदीदाराने या दोन्ही उत्पादनांना एकत्रित पाहू नये. कारण यामुळे जोखीमधारकाचे चुकीचे आकलन आणि भांडवलाच्या चुकीच्या वाटपाला प्रोत्साहन मिळू शकते. विमा सुरक्षेकरिता खरेदी केला जातो तर गुंतवणूक ही परतावा प्राप्त करण्याकरिता केली जाते.

३ बाजार आधीपासूनच उच्च स्तरावर आहेत :
जर तुम्ही ७ ते १० वर्षांच्या कालावधीकरिता युलिपमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर विमा एजंटद्वारे परतावा प्रदान करण्याचे वचन खोटे सिद्ध होण्याची शक्यता अधिक आहे. सध्याच्या कालावधीत भांडवली बाजार आधीच ऐतिहासिक उंचीवर आहेत. जोपर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार नाहीत किंवा पुढील ५ ते १० वर्षांमध्ये कंपन्यांच्या नफ्यात जलदतेने वाढ होत नाही तोपर्यंत भांडवली बाजार ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत अधिक परतावा प्रदान करणार नाहीत. या िबदूवर जर गुंतवणूकदार युलिप घेण्याचा निर्णय घेत असाल तरीही त्याने ‘सिंगल प्रीमियम पॉलिसी’द्वारे एकमूठ रक्कम जमा करण्यापासून वाचले पाहिजे. तसेच मासिक/तिमाही देयक विकल्पांना प्राधान्य दिले पाहिजे.

४ पॉलिसी घेताय, भरमसाट शुल्काविषयी माहिती घ्या:
जर तुम्ही ‘सिंगल प्रीमियम पॉलिसी’ची योजना आखत आहात तर तुम्हाला विस्तृत माहितीसह शुल्काविषयी माहिती प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ‘सिंगल प्रीमियम पॉलिसी’च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये वाटप शुल्क, पॉलिसी व्यवस्थापन शुल्क इत्यादी बरेच जास्त असतील, अशी शक्यता अधिक आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या सुरुवातीला मोठा धक्का लागू शकतो आणि दरवर्षी संचित रक्कम प्रभावित होऊ शकते. अशावेळी १० वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये गुंतवणुकीच्या परताव्यात मोठे अंतर येऊ शकते.

५ म्युच्युअल फंड अधिक परतावा देऊ शकतात:
व्यतित झालेल्या कालावधीमध्ये चांगल्या मानांकनाच्या म्युच्युअल फंडांतून चांगले प्रदर्शन केले असेल तेव्हाच युलिपमध्ये गुंतवणूक करणे चांगले असते. खर्च काढल्यानंतर, जे म्युच्युअल फंडांच्या तुलनेत युलिपमध्ये जास्त असतात तसेच म्युच्युअल फंड युलिन प्लॅनला मागे टाकत असतील तर तुम्हाला त्या खास युलिपमध्ये गुंतवणूकीपासून वाचले पाहिजे आणि इतर विकल्पांवर विचार केला पाहिजे. यामध्ये असलेले गणित थोडे किचकट वाटू शकते. विमाकर्त्यांद्वारे सादर करण्यात येणारा म्युच्युअल फंड आणि शुद्ध टर्म प्लॅनचे संयोजन युलिपपेक्षा अधिक चांगले होऊ शकते. तुम्ही योग्य वित्तीय सल्लागाराकडून सल्ला घेऊ शकता. तो उपयुक्त निर्णय घेण्यामध्ये निश्चितच तुमची मदत करू शकतो.

हिरेन धाकण
लेखक बोनान्झा पोर्टफोलियो या गुंतवणूक सल्लागार कंपनीचे निधी व्यवस्थापक

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five major reasons not to invest in ulip

ताज्या बातम्या