|| डॉ. आशीष थत्ते

अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रातील संकल्पनांचा सर्वसामान्यांकडून होत असलेल्या वापराचे भान करून देणारे साप्ताहिक सदर..

स्तर पुनक्र्रमित केल्यावर देखील प्रत्यक्ष कच्चा माल उत्पादनात यायला वेळ लागतो. या मधल्या काळात साठा कमी कमी होऊ लागतो आणि मग अशी वेळ येते की, आता थांबू शकतच नाही आणि उत्पादन बंद होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळेला काहीही किंमत देऊन नवीन कच्चा माल आणावा लागतो किंवा ऑर्डर दिली असल्यास तो लवकरात लवकर मिळवावा लागतो. यालाच ‘किमान पातळी’ म्हणतात. यामध्ये काही कंपन्या धोक्याची पातळीसुद्धा ठरवतात.

साधारण घरात देखील अशा काही वस्तू अशा प्रकारच्या असतात. उदारणार्थ दूध जे नेहमीच किमान पातळी वेळ किंवा कधी कधी थोडेसे वरच्या पातळी वर असते. अर्थात त्याचे नाशवंत असणे हे मुख्य कारण आहे. तुमच्या पाकिटातील पैसेसुद्धा असेच किमान पातळीवर आल्यावर एटीएममधून काढून ठेवावे लागतात. मग ते नवीन नियमांच्या अनुसार महिन्यातून सहाव्यांदा काढावे लागले आणि त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागली तरी काढावे लागतात. मग पाकीट (वॉलेट) डिजिटल असेल तर स्वयं मर्यादा ठेवण्याची सोय असते. म्हणजे विशिष्ट पातळीच्या खाली शिल्लक आली, की स्वयंचलितपणे बँक खात्यातून डिजिटल पाकिटात पैसे जमा होतात. मात्र किमान मर्यादा ही ठेवावीच लागते.

विविध प्रकारचा कच्चा माल वापरणाऱ्या कंपन्यांना किती मेहनत करावी लागत असेल. साठा अगदीच संपला तर शेजारच्या कंपनीतून मिळू शकतो, असे पर्याय उपलब्ध नसतात. पण आपल्या घरात वाटीचा व्यवहार आपण कित्येक वर्षे ठेवला आहे. याला मुख्यत्वे जबाबदार हे वापराचे प्रमाण असते. अचानक झालेला खूप वापर देखील किमान पातळी गाठली तरी भरून निघू शकत नाही जसे अचानक पाहुणे येणे आणि साखर संपणे वगैरे.

साठय़ाची किमान पातळी ही ठरवावीच लागते. अन्यथा भरमसाट पैसे मोजून आणावी लागते. जसे वैयक्तिक कर्ज घ्यावे लागणे म्हणजे पैशाची किमान पातळी गाठली आहे असे समजावे. सध्या औषधाची दुकाने २४ तास उघडी असतात. कारण, आपण किमान पातळीचे नियोजन करत नाही आणि कदाचित नेहमी घेणारी औषधे देखील अपरात्री विकत घ्यावी लागतात. तेव्हा प्रत्येक वस्तूचा किमान स्तर ठरवावा आणि वेळोवेळी त्या खरेदी कराव्यात. कंपन्यांमध्ये देखील अचानक उत्पादनाची मागणी वाढल्यास ती पूर्ण करायला अगदी विमानामार्गे देखील कच्चा माल मागवावा लागतो. तेव्हा स्तर पुनक्र्रमित करताना किमान पातळीसुद्धा निश्चित करा!

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ashishpthatte@gmail.com