Mangal Rashi Parivartan January 2024 :  ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. नवीन वर्ष २०२४ मध्ये अनेक ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती आणि भूमिपुत्र मंगळदेखील जानेवारी २०२४ मध्ये राशी बदलणार आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन १६ जानेवारी २०२४ रोजी होईल आणि या काळात मंगळ ग्रह धनू राशीत प्रवेश करील. मंगळ हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्याचे प्रतीक आहे, असे मानले जाते. त्यामुळे धनू राशीत मंगळाचे आगमन होण्याने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि त्यांना आर्थिक लाभही होईल, अशी शक्यता आहे. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या चार राशी; ज्यांच्यासाठी मंगळाचा राशिबदल शुभ ठरू शकतो.

मिथुन : २०२४ मध्ये मंगळाचे पहिले राशी परिवर्तन लाभाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील. १६ जानेवारीला मंगळाचा धनू राशीत प्रवेश होताच या राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. हा काळ त्यांच्यासाठी शुभ असेल आणि त्यासोबतच त्यांना व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश व प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठा हा काळ वरदानापेक्षा कमी नसेल.

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होईल. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. त्याशिवाय आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Rajyog 2024 : तब्बल ५० वर्षांनंतर जानेवारीत जुळून येणार तीन राजयोग; ‘या’ राशीच्या लोकांना होणार धनलाभ

सिंह : मंगळाचे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी अतिशय शुभ मानले जात आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ असेल. या काळात तुम्हाला लक्ष्मीच्या कृपेने अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. सुख-समृद्धी वाढेल.

कन्या : मंगळाच्या राशिबदलामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शुभ परिणाम होतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा दावा लोकसत्ता डॉट कॉम करीत नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)