Budh Gochar Cancer Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे. आता बुधदेव २२ जून २०२५ रोजी रात्री ९:३३ वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे गोचर हे पाच राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत, ज्यांना बुध गोचरचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

बुध गोचर २०२५: ‘या’ ५ राशींचं नशीब चमकणार!

मिथुन राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी, बुधाचे भ्रमण फायदेशीर ठरु शकते. तुमचं नशीब उघडण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची या काळात स्वप्न पूर्ण होऊ शकतात.

कर्क राशी

बुध गोचर थेट तुमच्या राशीत होणार असल्याने, कर्क राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकतो. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो.

कन्या राशी

कन्या राशीसाठी बुधाचे गोचर लाभदायी ठरु शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीतील लोकांना प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. या राशीतील लोकांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीतील लोकांना करिअर आणि व्यवसायात खूप मोठा फायदा होऊ शकतो. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते.

मीन राशी

बुधदेवाच्या कृपेने मीन राशीच्या लोकांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मान-सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)