Budh Mahadasha Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध महिन्यातून एकदा राशिबदल अर्थात गोचर करतो. बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, चतुरता, अर्थव्यवस्था, व्यवसाय व मित्र यांचा कारक मानला जातो. बुध कन्या आणि मिथुन राशीवर राज्य करतो. बुध ग्रह कन्या राशीत उच्च आणि मीन राशीत दुर्बल मानला जातो. बुधाची महादशा व्यक्तीवर १७ वर्षे टिकते. जर बुध तुमच्या कुंडलीत सकारात्मक असेल, तर त्या व्यक्तीला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या व्यक्ती हिशोबाच्या बाबतीतही हुशार असतात. त्यांची तर्कशक्ती चांगली असते. या व्यक्तींचा स्वभाव थोडा मजेदार असतो.

तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध नकारात्मक स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला संवादात अडचणी येऊ शकतात. म्हणजेच तो अडखळू बोलू लागतो. तसेच, तो गणितातही कच्चा असतो. तसेच त्याला वादविवादात हुशारीने बोलता येत नाही. तसेच, त्या व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता चांगली नसते. अशा परिस्थितीत बुध ग्रहाच्या महादशेचा जीवनात नेमका काय परिणाम होईल ते जाणून घेऊ…

जर कुंडलीत बुध ग्रह नकारात्मक स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला बुध ग्रहाच्या स्थितीत अशुभ फळ मिळते. तसेच, अशा व्यक्तीला व्यवसायात अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते. तसेच, त्याला आपला व्यवसाय बदलावा लागतो. त्या व्यक्तीला नाक, कान व त्वचेचे आजार होऊ शकतात. त्या व्यक्तीचे नातेवाइकांशी असलेले संबंध बिघडू शकतात. तसेच, त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच, बुध अशुभ स्थित असल्याने त्या व्यक्तीला संवादात समस्या येतात. त्या व्यक्तीला उधार घेतलेल्या पैशातूनही काहीच फायदा होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषशास्त्रानुसार, जर कुंडलीत बुध शुभ स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीचे संवादकौशल्य प्रभावी असते. तसेच, त्या व्यक्तीची तर्कशक्ती चांगली असते. ती व्यक्ती आर्थिक व्यवहारात चांगली असते. अशी व्यक्ती करिअर एमबीए, गणित शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, बँकिंग क्षेत्रात चांगले नाव कमवते. तसेच ती व्यक्ती एक उच्च व्यावसायिक असते. म्हणजेच ती व्यवसायात योग्य तो प्लॅन करून चांगले पैसे कमवते.