चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या महत्त्वाच्या खगोलीय घटना आहेत. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रातही त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या रात्री होणाार आहे. तब्बल तीस वर्षांनंतर शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होत असताना असा योगायोग घडणार आहे. यासोबतच अत्यंत शुभ मानला जाणारा ‘गजकेसरी योग’ही याच दिवशी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ३० वर्षांनंतर होणार्‍या चंद्रग्रहणाला दुर्मिळ योगायोग घडल्याने काही राशींना शुभ परिणाम मिळू शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना या शुभ संयोगामुळे धनलाभाचे शुभ योग जुळून येऊ शकतात. या काळात आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. प्रवासातूनही शुभ परिणाम मिळू शकतील. या काळात नावलौकिक होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालविता येऊ शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या मंडळींना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून सुरू असलेला मानसिक तणाव दूर होऊ शकतो. या काळात लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगली कमाई होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुखाची अनुभूती मिळू शकते.

(हे ही वाचा : २०२४ मध्ये वृषभसह ‘या’ ३ राशींच्या लोकांवर शनिदेवाची कृपा? ‘धन राजयोग’ घडल्याने होऊ शकतात कोट्यधीश )

कन्या राशी

कन्या राशीतील लोकांचा यावेळी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. शैक्षणिक आणि स्पर्धा क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीतील लोकांसाठी येणारा काळ खूप भाग्यवान ठरू शकतो. या राशीतील लोकांच्या सुख, संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. त्यामुळे पैशाची कमतरता दूर होऊ शकते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)