Gajkesari Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, २८ मे रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून या राशीत गुरू ग्रह आधीपासून विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीत येतात तेव्हा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो.

या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.

गजकेसरी राजयोग देणार पदोपदी यश

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरेल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)