Guru Nakshatra Parivartan Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. सुख-समृद्धी, मान-सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व राशींवर होतो. गुरु राशी परिवर्तनासह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पंचांगानुसार, आज शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी सकाळी देवगुरू बृहस्पती यांनी नक्षत्र परिवर्तन करून आपली चाल बदलली आहे. आज पहाटे ५ वाजून २६ मिनिटांनी बृहस्पती मृगशिरा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून बाहेर पडून मृगशिरा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश केला आहे. बृहस्पती १४ जूनपर्यंत या नक्षत्राच्या चौथ्या पदात राहणार आहेत. या नक्षत्र पद गोचराचा परिणाम सर्व राशींवर होणार असला, तरी ३ राशींवर याचा विशेष शुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे. बृहस्पतींच्या या नक्षत्र गोचरामुळे या ३ राशींच्या मंडळींना रातोरात श्रीमंती अनुभवता येऊ शकते. नेमक्या या तीन राशी कोणत्या व त्यांना कोणत्या स्वरूपात काय लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

‘या’ भाग्यवान राशींना होणार धनलाभ?

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरु शकते. मोठ्या कंपनीत नोकरी मिळू शकते. या दरम्यान या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. या काळात वाहन खरेदीचेही योग आहेत. या राशीच्या मंडळींचे दांपत्य जीवन सुखी राहील. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह बृहस्पतीच्या नक्षत्र परिवर्तनाने सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. यावेळी तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतात.

धनू

गुरूच्या नक्षत्र गोचरमुळे धनू राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. सरकारी नोकरीत असलेल्यांना बढतीची चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी नशिबाचे दार ठोठावतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)