Daily Horoscope Of All Zodiac Sign In Marathi, 2 June 2025 : २ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. रात्री ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत रवी योग जुळून येईल. रात्री ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत मघा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अडीच दिवसांसाठी आपली राशी बदलणारा चंद्र एका दिवसासाठी आपले नक्षत्र बदलतो. तर आज मघा नक्षत्रात चंद्राचे भ्रमण होईल. तर नवीन आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊया…
२ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope For Today, 2 June 2025)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope )
परिस्थितीला नावे ठेऊ नका. आपल्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधा. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope )
व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल. आपले मत गोडीने समजावून सांगाल. कामाचा व्याप वाढेल. अती श्रमाचा ताण राहील.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
हसतहसत कामे साधून घ्याल. तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा. आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. फसवणुकीपासून सावध राहावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामात हाताखालील सहकार्यांची मदत होईल. लहान मुलांत रमून जाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मनाची चंचलता जाणवेल. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. कामात प्रगतीला वाव आहे. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
कामे यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. टीकेला सामोरे जावे लागू शकते. हट्ट सोडावा लागू शकतो. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
कामातील चिकाटी वाढवावी. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द लागू शकतो. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
आपले उद्दीष्ट सध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
सामाजिक वादात अडकू नका. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर