Five Planet Conjunction in Mithun: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरांच्या विशिष्ट संयोगातून निर्माण होणारे त्रिग्रही व पंचग्रही योग हे अत्यंत प्रभावशाली मानले जातात. २०२५ मध्ये अशाच एक दुर्लभ संधीचा योग निर्माण होत आहे, जो गेल्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडून येतोय. २४ जून २०२५ रोजी मिथुन राशीत चंद्र, गुरू, बुध, शुक्र व सूर्य हे पाच ग्रह एकत्र येत असून, त्यामुळे ‘पंचग्रही योगा’ची निर्मिती होणार आहे. या पंचग्रही योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. कुंडलीच्या एखाद्या भावात किंवा राशीमध्ये पाच ग्रह येतात तेव्हा त्याला ‘पंचग्रही योग’ म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग काही विशिष्ट राशींना अपार लाभ, आर्थिक उन्नती, मान-सन्मान आणि भाग्यवृद्धीचे दरवाजे उघडून देणारा ठरु शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना या दुर्मीळ योगाचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो.
मिथुन राशीत जुळून येतोय पंचग्रही योग; ‘या’ राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश
वृषभ (Taurus)
पंचग्रही योग वृषभ राशीच्या धन आणि वाणी स्थानात तयार होतोय. त्यामुळे या राशीच्या मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना अचानक धनप्राप्ती, गुंतवणुकीतून फायदा आणि कामाच्या ठिकाणी यश मिळू शकतो. लेखन, पत्रकारिता, शिक्षण या क्षेत्रांत असणाऱ्यांसाठी हा योग विशेष फायदेशीर ठरु शकतो. तुमचं बोलणं आणि बुद्धिमत्ता या काळात लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरु शकतो. व्यापारात अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo)
हा योग कन्या राशीच्या कार्यक्षेत्र व करिअरच्या घरात निर्माण होतोय त्यामुळे ही कालावधी तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. पदोन्नतीचे योग, नवीन करार, आणि व्यवसायात भरभराट होऊ शकते. तुमची लोकप्रियता वाढेल, लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. वडिलांशी संबंध दृढ होतील आणि तुमचा सामाजिक प्रभावही वाढेल. नोकरीतील लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.
तूळ (Libra)
तूळ राशीत हा योग नवम भावात होत असल्यामुळे विशेष शुभदायक ठरणार आहे. या काळात नशीबाचा पूर्ण साथ लाभेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होऊ शकतात, मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. धन योगाचा लाभ मिळेल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)