scorecardresearch

३० जानेवारीपासून ‘या’ राशींना धनहानीचे योग; शनी अस्त होताच ‘या’ रूपात वाढू शकतात समस्या

Shani Asta 2023: शनिदेव कुंभ राशीत आपल्या घरी अस्त होत आहेत. या शनीच्या अस्तामुळे काही राशींना सतर्क राहण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

३० जानेवारीपासून ‘या’ राशींना धनहानीचे योग; शनी अस्त होताच ‘या’ रूपात वाढू शकतात समस्या
शनिदेव कुंभ राशीत होणार अस्त. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Asta 2023: शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तसेच एका राशीत ३० वर्षांनी शनिदेव येतात. या नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात १७ तारखेला शनीचे राशी परिवर्तन होणार असून त्यानंतर ३० जानेवारी रोजी शनिदेव कुंभ राशीत आपल्या घरी अस्त होत आहेत. या शनीच्या अस्तामुळे काही राशींना सतर्क राहण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याचीही शक्यता आहे. शनिचं कुंभ राशीत अस्त होणं काही राशीवर नकारात्मक परिणाम करणारे आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

शनि अस्ताचा ‘या’ राशींवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता

  • कर्क राशी

शनिदेव तुमच्या राशीच्या आठव्या भावात अस्त करणार आहेत. त्यामुळे शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी काही प्रमाणात हानिकारक ठरू शकते. या लोकांसाठी करिअर, आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम तुम्हाला सावध राहूनच करावे लागेल, कारण या काळात तुमची धनहानी होण्याचीही शक्यता आहे.

(हे ही वाचा << येत्या ५ दिवसात शुक्र आणि शनिदेव ‘या’ राशीच्या लोकांना करतील प्रचंड श्रीमंत? भाग्याचीही लाभेल साथ)

  • सिंह राशी

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. शनिदेव तुमच्या राशीतून सप्तम भावात विराजमान होणार आहेत. हे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही आर्थिक संकटात अडकू शकता. शनीचा अस्त तुमची आर्थिक स्थिती बिघाडू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पैशाचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.

  • वृश्चिक राशी

शनि ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात अस्त करणार आहे. त्यामुळे यावेळी शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या आईचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शनि संक्रमणाचा प्रभाव तुमच्या करिअरवरही दिसून येईल. शनीचा अस्त वृश्चिक राशीच्या लोकांना सावध करणार आहे. दुसरीकडे, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे या काळात तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 18:36 IST

संबंधित बातम्या