ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. २०२२ मध्ये अनेक मोठे आणि लहान ग्रह राशी बदलणार आहेत. या यादीत कर्मफल देणारे शनिदेवाचे नाव देखील समाविष्ट आहे. जेव्हा जेव्हा शनि ग्रह मार्गस्थो होतो, तेव्हा कोणत्यातरी राशीवर साडेसती आणिअडीचकीचा प्रभाव सुरू होतो. तर काही राशींना साडेसाती आणिअडीचकीपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांना साडेसाती आणि अडिचकीपासून मुक्ती मिळणार आहे. २४ जानेवारी २०२० पासून शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशीसाठी शनीची अडीचकी सुरू आहे. तर धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी साडेसाती सुरू आहे. एकाच वेळी पाच राशींवर शनिचा प्रभाव आहे. धनु राशीच्या लोकांसाठी शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मकर राशीचा दुसरा टप्पा, तर कुंभ राशीचा पहिला टप्पा सुरु आहे.

शनि २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशीची अडीचकीपासून मुक्तता होमार आहे. तर धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. मात्र १२ जुलै २०२२ रोजी शनि मकर राशीत वक्री होणार असल्याने पुन्हा तिन्ही राशी शनिच्या अधिपत्याखाली येतील. ही स्थिती १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहील. मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी शनिपासून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल.

Astrology 2022: गुरु ग्रहाच्या अस्तामुळे महिनाभर तीन राशींच्या अडचणीत होणार वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात शनि हा ग्रह वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, कर्मचारी, नोकर, तुरुंग इत्यादींचा कारक मानला जातो. हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तसेच, तूळ रास ही शनीची उच्च राशी आहे. मेष ही नीच राशी मानली जाते. शनिचे संक्रमण अडीच वर्षे एकाच राशीत राहते. ज्योतिषीय भाषेत याला शनि अडीचकी म्हणतात. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात मंद चाल असलेला ग्रह आहे. शनिची दशा साडेसात वर्षे असते. याला शनि साडेसाती म्हणतात.