Shani Surya Panchak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला कर्माचा न्यायाधीश मानले जाते. हा ग्रह प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्यानुसार शनि २०२७ पर्यंत मीन राशीत राहील. या काळात शनि आणि सूर्यामध्ये ७२ अंशांचा कोन तयार होत आहे, ज्याला पंचक योग म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग ३ जून रोजी पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी तयार होईल आणि त्याचा वाईट प्रभाव काही राशींवर दिसून येईल.
पंचक योग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ७२ अंशांच्या कोनात असतात तेव्हा पंचक योग तयार होतो. या परिस्थितीत ग्रह एकमेकांशी सकारात्मक उर्जेची देवाणघेवाण करतात. यावेळी शनि आणि सूर्य यांच्यामध्ये हा योग तयार होत आहे. वैदिक मान्यतेनुसार, पिता-पुत्र असूनही सूर्य आणि शनि हे शत्रू मानले जातात, यामुळे पंचग योग काही राशींसाठी अशुभ संकेत घेऊन येऊ शकतो. नेमकं कोणत्या राशींसाठी पंचक योग धोकादायक ठरू शकते ते जाणून घेऊया.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला कामात आणि कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. तुमचे वर्तन थोडे असभ्य असू शकते, ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे असेल. रोजच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. या काळात आईचा आधार तुम्हाला मानसिक आधार देईल.
तुळ (Libra)
तूळ राशीच्या लोकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा. विशेषतः धोकादायक गुंतवणूक टाळा, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आपले विचार इतरांवर लादण्याची प्रवृत्ती नुकसान पोहोचवू शकते. कठोर शब्द टाळा आणि संभाषणात गोडवा ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करा. गुप्त योजना उघड करू नका, धोरणात्मक विचार फायदेशीर ठरू शकतात.
कुंभ (Aquarius)
पंचक योगाच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांना राग आणि घाई टाळावी लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थंड डोक्याने विचार करा. सभ्य वर्तन स्वीकारा आणि कठोर परिश्रम करूनच तुम्हाला यश मिळेल. जोखमीच्या आर्थिक गुंतवणुकीपासून दूर रहा. कुटुंबात सुसंवाद राखण्याची गरज आहे, अन्यथा वाद होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये काळजी घेण्याची आवश्यक असेल.