Shukra Nakshatra Parivartan 2025: शुक्र (Venus) ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं. धन, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह २६ जून २०२५ रोजी सूर्याच्या कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करतोय. हा नक्षत्रपरिवर्तन काही राशींवर विशेष कृपादृष्टी घेऊन येणार आहे. या काळात तीन राशीच्या लोकांचं नशीब जबरदस्त चमकणार आहे. त्यांना आयुष्यात सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
२६ जूनपासून नशिबाचे दरवाजे खुलणार!
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचं आता फळ मिळू शकतं. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल, महत्त्वाचे निर्णय घेताना यश मिळेल. जोडीदारासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो.
सिंह राशी
शुक्राचा नक्षत्र प्रवेश सिंह राशीच्या लोकांना जबरदस्त बळ देऊ शकतो. विशेषतः नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची संधी मिळू शकते. नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्प हाती लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात, आर्थिक लाभाची शक्यता वाढू शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे आता मिळू शकतात. तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन आणि यशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊन उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
तूळ राशी
तूळ राशीसाठी हा काळ वैभवशाली ठरू शकतो. घर, गाडी किंवा जमीन खरेदीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. पूर्वीचे अडथळे दूर होऊन कामात गती येऊ शकते. प्रवास घडेल आणि तो लाभदायक ठरेल. नोकरदार वर्गाचं प्रमोशन होणार असून वेतनात वाढ होऊ शकते. कमाई आणि बचतीचं योग्य गणित जुळून येईल. या राशींचे लोक दागिण्यांची खरेदीही करु शकतात. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)