Yogini Ekadashi 2025 : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात एकादशीची उपवास केल्याने विष्णु देवाची विशेष कृपा दिसून येते आणि जीवनातील सर्व दु:ख दूर होते. दर महिन्याला दोन एकादशी तिथी येतात. एक शुक्ल पक्षामध्ये तर एक कृष्ण पक्षामध्ये. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकदशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा योगिनी एकादशी कधी आहे, तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व इत्यादी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

योगिनी एकादशी 2025 तिथि आणि शुभ मुहूर्त (Yogini Ekadashi 2025 Date and Shubh Muhurat)

पंचागनुसार, आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथी २१ जून रोजी आहे. पंचांग नुसार, एकादशी तिथीची सुरूवात २१ जून ला सकाळी ७ वाजून १८ मिनिटांनी होणार आणि या तिथीची समाप्ती २२ जून रोजी सकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी होणार. त्यामुळे उदय तिथीनुसार या एकादशीचा उपवास २१ जून रोजी शनिवारी करावा.

योगिनी एकादशीच्या उपवासाचे पारण कधी करावे? (Yogini Ekadashi 2025 Vrat Paran)

योगिनी एकादशी उपवासाचे पारण दुसऱ्या दिवश २२ जून २०२५ रोजी करावे. या दिवशी शुभ वेळ दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपासून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत आहे. पारण करताना सात्विक अन्न ग्रहण करावे.

योगिनी एकादशीची पूजा विधि (Yogini Ekadashi 2025 Puja Vidhi)

योगिनी एकादशीचा उपवास दशमी तिथिच्या सायंकाळपासून सुरू होईल. दशमीला गहू, मूग आणि मीठाचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास धरावा. पूजेच्या ठिकाणी एका कलशमध्ये पाणी भरावे. विष्णुचा फोटो समोर ठेवून दिवा लावावा. त्यानंतर देवाला पुष्प, फळ आणि तुळशी अर्पण करावे. विष्णु सहस्रनाम किंवा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करावी आणि प्रसाद अर्पण करावा. प्रसादामध्ये तुळशीचे पान टाकावे यामुळे पूजा संपन्न झाली, असे मानले जाते.

योगिनी एकादशीचे महत्व (Yogini Ekadashi 2025 Importance)

धार्मिक ग्रंथांमध्ये योगिनी एकादशीचे महत्त्व अत्यंत अनन्यसाधारण आहे. या दिवशी उपवास केल्याने आणि विष्णुची पूजा केल्याने ८८ हजार ब्राम्हणांना जेवण देण्याबरोबरीचे पुण्य लाभते. असं म्हणतात, या उपवासाने पाप दूर होते, आयुष्यात सुख समृद्धी लाभते. अडथळे दूर होतात आणि आयुष्य सुखमय होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.