विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनची तार तुटल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील अंबीलवडगाव येथे शनिवारी हा दुर्दैवी प्रकार घडला.
अंबिलवडगाव येथे अशोक तांदळे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी ७ मजुरांसह क्रेनच्या साह्य़ाने विहिरीतील माती बाहेर काढण्यात येत होती. या वेळी क्रेनची तार तुटून त्याचे पाटे विहिरीत पडले. त्याखाली दबून बिभीषण दगडू वाघमारे (वय ४५, जानकापूर, तालुका वाशी) व ित्रबक मुरलीधर खराडे (वय ४५, अंबिलवडगाव) या दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अन्य मजुरांसह ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून नेकनूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2016 रोजी प्रकाशित
विहीर खोदकाम करताना क्रेन तुटून दोन मजूर ठार
विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनची तार तुटल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 29-05-2016 at 02:52 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two workers killed in crane accident while digging well