छत्रपती संभाजीनगर – सीमकार्ड, आधारकार्डचा वापर करून “आपल्याविरुद्ध सीबीआय, ईडी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे” असे बनावट फोन, लिंक पाठवण्याचे प्रकार निदर्शनास आल्याचे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले. अशा बनावट फोन, लिंकला बळी न पडता तत्काळ सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याशी (9226514017) संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.

हेही वाचा >>> लोकप्रतिनिधीना गावबंदी करू नये; खंडपीठाचे आदेश, मनोज जरांगे पाटलांची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाज माध्यमावरून एक चित्रफित प्रसृत करून उपरोक्त विषयानुषंगाने माहिती देताना पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड, सीमकार्डचा वापर करून फोन केला जातो. फोनमुळे संबंधित व्यक्ती घाबरून जाते. त्यानंतर  तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने ऑनलाईन स्टेटमेंट घेऊ, असे सांगितले जाते. बोलणाऱ्या व्यक्तीच्या मागे ईडी,  सीबीआय किंवा एखाद्या पोलीस ठाण्याची पाटी किंवा कार्यालयीन चित्र (सेटअप) दर्शवण्यात येते. पण तो प्रकार बनावट असतो. आभासी पद्धतीने स्टेटमेंट घेऊ किंवा अटक दाखवू म्हणत बेलबॉण्ड पाठवला जातो. त्यानंतर दोन लाख, पन्नास हजारांची मागणी करून एक लिंक पाठवली जाते. या शिवाय अन्य प्रकारही घडत आहेत. शेअर ट्रेडिंगच्या टिप्स देत, नफ्याचे आमिष दाखवत फायदा करून दिला जाऊन अकाऊंट उघडण्यास लावले जाते. त्यासाठी एक लिंक पाठवली जाते. काही वेळाने लिंक गायब होऊन फसगत झाल्याचे नंतर लक्षात येते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून बनावट लिंक, फोनची सायबर ठाण्याकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.