लवकरच मारुती सुझुकी आपली नवीन 2022 बलेनो बाजारात लॉंच करणार आहे. यावेळी कंपनी आपल्या कारमध्ये अनेक हायटेक फीचर्स देणार आहे. यातील काही वैशिष्ट्ये अगदी नवीन असतील आणि या सेगमेंटमध्ये प्रथमच एखाद्या कारसाठी हे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. नुकतंच कंपनीने ही माहिती दिली आहे की नवीन बलेनो ३६० डिग्री कॅमेरासोबत येईल. हे फीचर केवळ कार पार्क करण्यातच मदत करणार नाही तर ब्लाइंड स्पॉट्समध्ये देखील ड्रायव्हरला मदत करेल.

मारुती सुझुकीने 2022 बलेनोला हेड्स अप डिस्प्ले स्क्रीन सुद्धा दिले आहे जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आला आहे. याशिवाय नवीन प्रीमियम हॅचबॅक अपडेटेड ९ इंच एचडी स्क्रीनच्या इंफोटेंमेंट सिस्टीम सोबत येईल. कंपनी या कारला सराऊंड सेन्स फीचर देखील देणार आहे जे आर्किम्स वरून चालते. यावरून असा दावा केला जात आहे की केबिनमध्ये बसलेल्या लोकांना ते अकॉस्टिक साउंड देईल.

तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप खराब झालाय? सारखा चार्ज करावा लागत असेल तर जाणून घ्या ‘या’ टिप्स

असा अंदाज आहे की 2022 मारुती सुझुकी बलेनोमध्ये तत्कालीन मॉडेलमधील इंजिन दिले जाईल. अशातच नवीन कार त्याच १.२ लीटर पेट्रोल इंजिनसह येईल जी ५ स्पीड मॅन्युअल आणि ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये येते. मात्र,नवीन मॉडेलनुसार या इंजिनची शक्ती काहीशी वाढवता येऊ शकते. याशिवाय कारचे मायलेजही वाढवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलेनो प्रीमियम हॅचबॅकचा कंपनीच्या विक्रीत मोठा वाटा आहे आणि २०१५ मध्ये लॉंच झाल्यापासून, कंपनीने आतापर्यंत या कारच्या १ दशलक्षाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. मारुतीने २०२२ मॉडेल बलेनोसाठी बुकिंग सुरु केले आहे. ग्राहक ११ हजार रुपये टोकन देऊन कार बुक करू शकतात. बाजारात या कारची टक्कर टाटा अल्ट्रॉझ, ह्युंदाई आय२० आणि होंडा जॅज यांच्यासोबत आहे. याशिवाय, ६-९ लाख रुपयांच्या श्रेणीतील निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखील या स्पर्धेत आहेत.