जपानी वाहन निर्माता कंपनी Honda ने भारतातील त्यांच्या बहुतांश उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे. मॉडेलच्या आधारावर विनामूल्य अॅक्सेसरीज तसंच एक्सचेंज आणि लॉयल्टी सारखे भन्नाट ऑफर होंडा कंपनी देत आहे. होंडा सिटी सेडान आणि सबकॉम्पॅक्ट क्रॉसओवर SUV Honda WR-V यासह होंडाच्या लोकप्रिय कारच्या रेंजवर या महिन्यात ३५,५९६ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. ही ऑफर फक्त फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत वैध असेल. या कार्सवर तुम्हाला काय ऑफर दिली जात आहे ते जाणून घ्या..

Honda City
या कारवरील ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, एक्सचेंज बेनिफिट्स आणि ५,००० आणि ८,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट व्यतिरिक्त, Honda City ग्राहकांना १०,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा १०,५०० रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज मिळू शकतात. याशिवाय ग्राहकांना या कारवर १२,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.

Honda Amaze
नवीन Honda Amaze बद्दल बोलायचं झाल्यास, कॉर्पोरेट ग्राहकांसाठी ४,००० रुपयांची सूट आहे आणि सर्व प्रकारांमध्ये १५,००० रुपयांचे फायदे उपलब्ध आहेत. याशिवाय, विद्यमान Honda ग्राहकांना ६,००० रूपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५,००० रूपयांच्या लॉयल्टी बोनसचा लाभ घेता येईल.

आणखी वाचा : Hero NYX HX इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १६५ km ची रेंज देते, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda Jazz
१०,००० रूपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा १२,१५८ रूपये किमतीच्या मोफत ऍक्सेसरीज व्यतिरिक्त Honda Jazz वर ३३,१५८ रूपयांपर्यंत फायदे देऊ शकते. ग्राहकाला कार एक्स्चेंजवर ५,००० ची सवलत देखील मिळू शकते तर विद्यमान Honda ग्राहकांना कार एक्सचेंजवर ७,००० चा बोनस आणि लॉयल्टी बोनसवर ५००० चा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. याशिवाय कंपनी ४,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही देत ​​आहे.

आणखी वाचा : TVS iQube vs Bajaj Chetak दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरपैकी कोणती आहे चांगली? जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत

Honda WR-V
Honda WR-V वर २६,००० रूपयांपर्यंत सूट मिळेल, ज्यामध्ये १०,००० रूपयांचे एक्सचेंज डिस्काउंट आणि ४,००० रूपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. दुसरीकडे होंडा ग्राहकांना ५००० रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि ७००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda Coty (Fourth Generation)
फोर्थ जनरेशनच्या Honda City वर ७,००० रुपयांच्या एक्सचेंज बेनिफिटसह आणि विद्यमान Honda ग्राहकांसाठी ५००० रूपयांचा अतिरिक्त बोनससह येतो. याशिवाय कंपनी ८००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही देत ​​आहे.