How Not To Refuel: आजकाल बहुतांश लोकांकडे खासगी गाडी असते. काहीजण दुचाकी चालवतात, तर काहीजणांकडे चारचाकी कार असते. जेव्हा स्कूटर, बाईक किंवा कारमध्ये पेट्रोल/ डिझेल कमी होते, तेव्हा पेट्रो पंपावर जाऊन त्यामध्ये इंधन भरावे लागते. वाहनांमध्ये इंधन भरताना आपण नकळत काही चुका करतो. या लहानसहान चुका अनेकांना नगण्य वाटतात. पण दीर्घकाळ या चुका केल्याने भविष्यात त्रास होऊ शकतो. तर काही चुका आपल्यासाठी घातक ठरु शकतात.

Hindustan times ने दिलेल्या माहितीनुसार, Refuelling करताना काही मूलभूत गोष्टी फॉलो न केल्याने इंधन भरणे त्रासदायक ठरु शकते. जर तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन कार किंवा बाईकच्या इंधनाची टाकी भरणार असाल, तर या चुका टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

इंधनाची किंमत तपासा.

पेट्रोल पंपावर जाण्याआधी इंधनाच्या किंमतीची माहिती घ्यावी. सामान्यत: प्रत्येक इंधन भरण्याच्या स्टेशनवर पेट्रोल आणि डिझेलच्या सुधारित दर दिलेले असतात. इंधनाची पेट्रोल पंपावरील किंमत आणि तेल विपणन कंपन्यानी घोषित केलेली किंमत समान आहे की नाही हे तपासून घ्या. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही, तसेच तुमचे पैसेदेखील वाचतील.

Fuel dispenser शून्यावर सेट असल्याचे सुनिश्चित करा.

वाहनामध्ये इंधन भरायला सुरुवात करण्यापूर्वी Fuel dispenser मशीन शून्यावर असल्याची खात्री करुन घ्यावी. असे न केल्यास पंपावरील लोक तुम्हाला फसवू शकतात. अशा प्रकारे सर्वसामान्यांची सहज फसवणूक केली जाते. या फसवणूकीला बळी न पडण्यासाठी इंधन भरण्यापूर्वी Fuel dispenser शून्यावर सेट आहे की नाही हे तपासून घ्यावे.

आणखी वाचा – Kia Seltos ने रचला मोठा विक्रम; Kia कंपनीने फक्त चार वर्षांमध्ये केली ५ लाख सेल्टोस कार्सची विक्री; बनली भारतातील टॉपची SUV कार

इंजिन बंद करावे.

इंधन भरताना नेहमी गाडीचे इंजिन बंद ठेवावे. पेट्रोल आणि डिझेल हे अत्यंत ज्वलनशील असते. इंजिन सुरु असल्याने अचानक अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरायला गेल्यावर इंजिन बंद करायला सांगितले जाते.

ऑटो-कट केल्यानंतर इंधनाची टाकी भरणे टाळा.

पेट्रोल पंपामध्ये Fuel dispenser सह ऑटो-कट फंक्शन देखील असतात. यामुळे इंधनाची टाकी ठराविक प्रमाणात भरल्यावर इंधन भरणे थांबवते. वाहनाची टाकी भरल्यानंतर त्यामध्ये पेट्रोल/ डिझेल काठोकाठ भरु नका. ऑटो-कट केल्यानंतर इंधनाची टाकी भरणे थांबवा. असे केल्याने इंधनाची बचत होते.

आणखी वाचा – Honda Elevate SUV आज भारतात होणार लॉन्च; स्टायलिंग फिचर्सची माहिती आली समोर, किंमत मात्र गुलदस्त्यात..

मोबाईल फोन, लायटरचा वापर करु नका.

पेट्रोल, डिझेल सारखे अत्यंत ज्वलनशील द्रव्य असलेल्या ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. पेट्रोल पंपावर लायटर वापरु नये. मोबाईलमधील Electromagnetic waves मुळे तसेच लायटरच्या एका छोट्याशा ठिणगीमुळे मोठा अपघात होऊ शकतो.