अमेरिकन कार उत्पादक कंपनी फोर्ड मोटरचा लक्झरी कार ब्रँड लिंकन त्याच्या कारच्या उत्कृष्ट लुकसाठी जगभरात ओळखला जातो. नुकतंच लिंकनने आपल्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल१०० (L100) ही कन्सेप्ट कार सादर केली आहे. ही लक्झरी फ्युचरिस्टिक कार एरो-कट डिझाईन स्टाइलिंग आणि प्रगत इंटीरियर तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. लिंकन एल१०० कन्सेप्ट कार पेबल बीच कॉन्कोर्स डी’एलिगन्स येथे प्रदर्शित केली जाईल.

कशी असेल कारची डिझाईन?

लिंकनने शेअर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीला या कारद्वारे आपल्या पहिल्या लक्झरी कार, १९२२ मॉडेल एलला श्रद्धांजली वाहायची आहे. एल१०० कारची बाह्य रचना स्पेसशिपसारखी आहे. ही एक लो फ्लोर कार असल्याने ती जामिलीला लागून असल्यासारखी दिसते. या कारमध्ये काचेचं छत आणि मागील बाजूस उघडणारे दरवाजे देण्यात आले आहेत. हे या कारला भविष्यकालीन रूप देतात.

कार विकत घ्यायची आहे? पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय

ही कार लोकांना समजू शकणार

एल१०० कन्सेप्ट कारचे आतील भाग अनेक प्रकाश सेन्सर्स आणि मोशन सेन्सर्सने सुसज्ज आहेत. हे सेन्सर्स केबिनमधील हालचालींमधून एखाद्या व्यक्तीची उपस्थिती ओळखून आपोआप कार चालू करतील. हे तंत्रज्ञान खूप प्रगत असेल आणि ते कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास देखील मदत करेल. अ‍ॅम्बियंट लाइट, डिजीटल फ्लोअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आणि जीपीएस सेन्सर इ. तुम्ही गाडीच्या आत बसताच कार्यान्वित होतील. यांच्या मदतीने वापरकर्त्याला सर्वोत्तम अनुभव मिळेल.

लिंकनची कन्सेप्ट कार एल१०० ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आणि कनेक्टिव्हिटी असलेली स्वयंचलित कार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारमध्ये नेक्स-जेन बॅटरी सेल वापरण्यात येणार आहेत, जे जास्त पॉवर डेन्सिटीसाठी सक्षम असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंकनचे अध्यक्ष जॉय फालोटिको म्हणतात की एल१०० कन्सेप्ट मॉडेल लिंकनच्या कथेत एक नवीन अध्याय चिन्हांकित करेल. याद्वारे, भविष्यातील ग्राहकांसाठी लिंकन कसा असेल याची कल्पना करता येईल.