Hurry Up: महिंद्राच्या ‘या’ गाड्यांवर ८२ हजार रुपयांपर्यंत सूट; फक्त महिनाभरासाठी ऑफर

महिंद्रा अँड महिंद्राने नोव्हेंबर महिन्यासाठी काही निवडक मॉडेलवर आकर्षक ऑफर दिली आहे.

scorpio_m
Hurry Up: महिंद्राच्या 'या' गाड्यांवर ८२ हजार रुपयांपर्यंत सूट; फक्त महिनाभरासाठी ऑफर

महिंद्रा अँड महिंद्राने नोव्हेंबर महिन्यासाठी काही निवडक मॉडेलवर आकर्षक ऑफर दिली आहे. ग्राहकांना या संधीचा फायदा उचलण्यासाठी महिनाभराचा अवधी आहे. एसयूव्हीवर ८१,५०० रुपयांपर्यंतची सूट मिळेल असं ऑफिशियल वेबसाईटवर माहिती दिली आहे. यात कॅश डिस्काउंट, फायनान्स बेनिफिट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि एक्स्ट्रा ऑफरसारखे बेनिफिट मिळणार आहेत. मात्र या ऑफरचा अवधी ३० नोव्हेंबरपर्यंतच आहे. तसेच ऑफर्स वेगवेगळ्या डिलरशिपसाठी वेगवेगळी असू शकतो. महत्त्वाचं म्हणजे महिंद्रा थार, बोलेरो नियो आणि XUV700 वर ही ऑफर लागू नाही. KUV100 NXT ला ६१,०५५ पर्यंत सूट मिळेल अशी वेबसाईटवर माहिती आहे. यात ३८,०५५ रुपयांची रोख, २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ३ हजारापर्यंत कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

महिंद्रा स्कॉर्पियो
महिंद्रा स्कॉर्पियोवर जवळपास ३२,३२० रुपयांची सूट आहे. यात १५ हजार रुपये एक्सचेंज बेनिफिट्स, ४ हजार रुपये कॉरपोरेट ऑफर, १३,३२० रुपये इतर ऑफर यांचा समावेश आहे.

महिंद्रा Alturas G4 SUV
महिंद्रा Alturas G4 SUV वर जवळपास ८१,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यात ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ११,५०० रुपयांचा कॉर्पोरेट ऑफर आणि २० हजारापर्यंत इतर ऑफरचा समावेश आहे. तर XUV300 वर ४९ हजार रुपायांपर्यंत बेनिफिट ऑफर मिळत आहे. यात १५ हजार रोख, २५ हजार एक्सचेंज बोनस आणि ४,५०० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सहभागी आहे.

महिंद्रा Marazzo आणि Bolero
नोव्हेंबर महिन्यात महिंद्रा Marazzo MPV वर जास्तीत जास्त ४०,२०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यात ग्राहकांना २० हजार रुपयांपर्यंत रोख, १५ हजारापर्यंत एक्सचेंज बेनिफिट आमि ५२०० रुपयापर्यंत कॉर्पोरेट ऑफर मिळणार आहे. तर महिंद्रा Bolero वर १३ हजारांपर्यंत सूट मिळू शकते. त्यात १० हजारापर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजारपर्यंत कॉर्पोरेट ऑफर असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahindra offer discount on some model in november month rmt

Next Story
आता ‘विना बॅटरी’ इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता; भारतीय कंपनीने आणली नविन स्कीमBounce_Electric_Scooter
ताज्या बातम्या