TATA Motors Nano Electric Car: टाटा मोटर्सचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे नॅनो कार. येत्या काळात टाटाची नॅनो पुन्हा बाजारात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. लहान कुटुंबाला साजेशी अशी छोट्या आकाराची नॅनो बाजारात दाखल होताच सर्वांनी कौतुक केले होते. मात्र पुढे जाऊन नॅनोच्या प्रवासात अनेक तक्रारी समोर आल्याने खरेदीवर परिणाम झाला होता. विशेषतः महामार्ग किंवा घाटात प्रवास करताना नॅनोची क्षमता कमी पडत असल्याची तक्रार समोर आली होती. नवीन अपडेटनुसार, टाटा कंपनी या नॅनो कार सुधारणांसह पुन्हा बाजारात आणणार असल्याचे समजत आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे ही नॅनो कार आता विद्युत वाहन म्हणून बाजारात लाँच केली जाऊ शकते.

अलीकडेच टाटा मोटर्सचे मुख्य अधिकारी एन चंद्रशेखरन यांनी टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात प्रगती करू पाहत असल्याचे हायलाईट केले होते. ७७ व्या एजीएममध्ये त्यांनी सांगितले की कंपनीने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५,००० आणि वर्ष २०२२ मध्ये १९,५०० इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत. तर चालू आर्थिक वर्षात ५०,००० इलेक्ट्रिक वाहने विकण्याचे कंपनीचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तर २०२४ पर्यंत तब्बल १ लाख वाहने विकण्याचा टाटाचा मानस आहे.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहने

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या Nexon EV, Tigor EV, Tiago EV आणि Xpres-T EV यांचा समावेश आहे. कंपनीने आधीच आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या १० डिझाईन येत्या पाच वर्षात बाजारात येणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा<< FIFA World Cup 2022: मेस्सीच्या अर्जेंटिनाला हरवणाऱ्या ‘या’ फुटबॉलपटुंना १० कोटीची कार बक्षीस; फीचर्स ऐकाल तर..

टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार

टाटा नॅनो ही गाडी २००८ मध्ये लाँच करण्यात आली होती तर १० वर्षांनी म्हणजेच २०१८ मध्ये याचे उत्पादन थांबवण्यात आले होते. २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये Electra EV ने त्याच नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट तयार करून रतन टाटा यांना गाडी भेट दिली होती. नॅनो इव्ही ही चार सीटर कार असून तिची रेंज १६० किमी आहे. ही कार १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते ६० किमी प्रतितास वेग गाठू शकते, अशी माहिती कंपनीने दिलेली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन नॅनो ईव्हीचे “उत्पादन” करण्याची योजना सुरू झाली, तर कंपनी मराईमलाईनगरमधील फोर्ड प्लांटच्या अधिग्रहणाबाबत तामिळनाडू सरकारशी बोलणी पुन्हा सुरू करू शकते.